लातूर :-
राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे उप मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोदगा जि.लातूर येथे बांबू क्लस्टर च्या निर्मितीची घोषणा केली आहे. लोदगा जि.लातूर येथे बांबू पासून फर्निचर तयार करावयाच्या बांबू क्लस्टर निर्मिती साठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उप मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता.
लोदगा जि.लातूर येथे अत्याधुनिक दर्जाचा बांबू पासून विविध प्रकारचे साहित्य बनविण्याचा प्रकल्प कार्यान्वित असून या द्वारे आम्ही शेतकऱ्यांच्या शेती मध्ये बांबू लागवड करून त्यांचा तयार बांबू खरेदी करून बचत गटांच्या ३०० महिलांच्या माध्यमातून बांबू फर्निचर बनविण्याचे कार्य करीत आहोत. या प्रकल्पाकरिता आम्ही अत्याधुनिक दर्जाचा फर्निचर बनविण्याचा प्रकल्प निर्माण केला आहे.

केंद्र शासन व राज्य शासन यांच्या आर्थिक सहयात्तेतून तयार होणारे हे देशातील पहिले बांबू क्लस्टर आहे. लातूर जिल्ह्यामध्ये बांबू क्लस्टर निर्मिती ची घोषणा केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उप मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा यांचे आभार व्यक्त करतो.
..या घोषणेमुळे ग्रामीण महिलांना बांबू फर्निचर च्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार आहे, तसेच बांबू शेती च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सुब्बता येणार आहे. असे मत कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष तथा बांबू लागवड चळवळीचे प्रणेते मा. आमदार पाशा पटेल यांनी मांडले आहे.