19.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeउद्योग*यावर्षी सोन्याचे दर प्रति तोळा ५८,००० रुपयांवर जाण्याचा अंदाज: एंजल वन*

*यावर्षी सोन्याचे दर प्रति तोळा ५८,००० रुपयांवर जाण्याचा अंदाज: एंजल वन*

मुंबई, ९ जानेवारी २०२३: यावर्षी सोन्याचे दर प्रति तोळा ५८,००० रुपयांवर जातील असा अंदाज एंजल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये सोन्याचे दर २१०० डॉलर्स प्रति औंस होण्याची शक्यता आहे. ज्यांना सोन्याच्या खरेदीतून मूल्यनिर्मिती करायची आहे त्यांच्यासाठी ४८,०००-५०,००० प्रति दहा ग्रॅम श्रेणीतील सोने खरेदी करणे व जमवून ठेवणे हा पर्याय ठरू शकतो. दरवाढीनुसार भावनेच्या भरात खरेदी करण्यापेक्षा गुंतवणूकदारांनी धोरणीपणे प्रत्येक टप्प्यावर सोने खरेदी करून जमवून ठेवावे असा सल्ला त्यांनी गुंतवणूदारांना दिला.

गतवर्षी कमोडिटीतील मोठ्या वाढींसाठी तसेच घसरणींसाठी डॉलर केंद्रस्थानी राहिला आहे. डॉलरची ताकद व कमोडिटी यांच्यातील व्यस्त सहसंबंध हा गेल्या अनेक दशकांपासून नियम झाल्यासारखा आहे. अर्थात, दोन वर्षे सलग भक्कम राहिलेल्या अमेरिकी डॉलर निर्देशांकात (डीएक्सवाय), प्रत्यक्ष व अपेक्षित दर फरक सातत्याने वाढत असूनही, नुकतीच तीव्र घसरण झाली आहे. २०२३ मध्ये डॉलर घसरतच राहिला, तर कमकुवत डॉलर व वाढत्या कमोडिटी यांच्यातील व्यस्त सहसंबंध आपल्याला दिसून येईल आणि सोने व चांदी या सहसंबंधांचे सर्वांत मोठे लाभार्थी ठरतील असे मत श्री प्रथमेश माल्या यांनी व्यक्त केले.

एकंदर, २०२२ हे वर्ष रोलर कोस्टर राइडसारखे ठरले, नेमके काय होणार आहे याबद्दल आपल्यापैकी कोणालाच अंदाज बांधता आला नाही. मात्र, २०२३ मध्ये, प्रमुख बाजारांमध्ये मंदीची शक्यता असल्यामुळे २०२२ मधील इक्विटी व कॉर्पोरेट रोख्यांची निकृष्ट कामगिरी पुढे तशीच सुरू राहील अशी शक्यता आहे. याउलट सोने संरक्षण पुरवू शकते, कारण मंदीच्या काळात सोन्याची कामगिरी चांगली होते, गेल्या सातपैकी पाच मंदींच्या काळात सोन्याची कामगिरी सकारात्मक राहिली आहे. म्हणूनच, २०२३ मध्ये सोने दोनअंकी मोबदला मिळवून देईल अशी अपेक्षा आपण ठेवू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]