निलंगा,-( प्रतिनिधी )-
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंञी डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या 91 व्या जयंती निमित्ताने निलंगा शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी मुख्यमंञी डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या राजकारणात विकासात्मकता,कल्पकता,दूरदृृष्टीपणा ठेवून आपल्या कालखंडात नावलौकिक कमावणारे व्यक्तिमहत्त्व उदयास आले त्यांच्या जयंती निमित्ताने निलंगा शहरात दि.9 रोजी सकाळी 7:35 वाजता ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरामध्ये महादेवास अभिषेक,8 वाजता हजरत पिरपाशा दर्गा येथे चादर चढविणे,9 वाजता महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन,9:30 वाजता हजरत दादापीर दर्गा येथे चादर चढविणे,10 वाजता उपजिल्हा रूग्णालय,निलंगा येथे रूग्णास फळ वाटप,10:30 वाजता छञपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन,11वाजता छञपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व पक्षीय व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन,11:30 वाजता सिंदखेड रोड शेतामध्ये दादाबाग येथील समाधीस्थळावर दर्शन व पुष्पहार अर्पण,11:50 वाजता अशोक बंगला येथे शहरातील व बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांच्या अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याशी गाढीभेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर जयंती उत्सव समितीच्या वतीने अशोकराव पाटील निलंगेकर मिञ मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,माजी बांधकाम सभापती सिराज देशमुख,महंमदखाँ पठाण,लाला पटेल,प्रकाश बाचके,अजित नाईकवाडे,अशोक शेटकार,नवनाथ कुडुंबले,अमोल सोनकांबळे आदींने कळविले आहे.
महाराष्ट्र महाविद्यालयात आयोजित डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.9 रोजी दुपारी 3:00 वाजता डाॅ.संजय वाघमारे ( प्राचार्य,शिवजागृृती महाविद्यालय,नळेगाव ता.चाकूर जि.लातूर ) यांचे विशेष व्याख्यान स्थळ-महाराष्ट्र महाविद्यालय,निलंगा येथे आयोजित करण्यात आले आहे.तसेच,महाराष्ट्र काॅलेज आँफ फार्मसीत रक्तदान शिबीराचे आयोजन 10 वाजता करण्यात आले आहे.