लातूर
महाराष्ट्र राज्यातील बाजार समित्यांचा महासंघ म्हणुन ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ पुणेची पंचवार्षीक निवडणुक १८ मार्च २०१८ मध्ये झाली होती. २१ मार्च २०१८ रोजी रोजी मतमोजणी होती मात्र २० मार्च २०१८ रोजी सर्वोच्य न्यायालयाने मतमोजणीस स्थगिती दिली होती.
सर्वोच्य न्यायालयाने या संदर्भात उच्च न्यायालयाने निर्णय घेण्याचे आदेश दिले या आदेशान्वये दिनांक १५ मार्च रोजी उच्च न्यायालयाने मतमोजणी करणे तसेच मतमोजणी पासुन पुढे पाच वर्षे नवीन संचालक मंडळाचा कालावधी असेल असे आदेश दिले या वरुण दिनांक २७/०३/२०२२ रोजी पुणे येथे मतमोजणी होती. नांदेड ,लातुर या विभागातील एकुण ३० बाजार समिती पैकी ०९ बाजार समिती मतदानासाठी पात्र होत्या या विभागात औसा बाजार समितीचे माजी उपसभापती संतोष सोमवंशी विरुध्द लातूर बाजार समितीचे सभापती ललीतकुमार शहा अशी लढत आली होती या मध्ये संतोष सोमवंशी विजयी झाले आहेत.
या निवडीबद्दल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर , शिवसेना संपर्क प्रमुख संजय मोरे, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या