भाग -४
हसने का बहाना….😅
एकदा एका शेताच्या बांधावरून जाताना पु. ल. देशपांडेंनी शेतकऱ्याला विचारलं….
काय हो शेतकरी बुवा या झाडाला कोणतं खत घातलं तर चांगले टोमॅटो येतील?…. त्यावर शेतकरी म्हणाला या झाडाला माझ्या हाडांच जरी खत घातलं तरी टोमॅटो येणार नाहीत कारण हे वांग्याचं झाड आहे. 🤗
2)एकदा साहित्य संघात कु़ठल्यातरी नाटकाचा प्रयोग चालु असताना काहीतरी धपकन पडल्याचा आवाज आला त्यावर बाजुचा पु. लं ना म्हणाला काहो काय पडलं.. त्यावर पु. लं म्हणाले ना$$$$टक दुसरं काय? 🤣

जीवनाच्या प्रचंड धावपळीत, व्यस्त दिनक्रमात, अनेक चिंतांनी घेरलेला माणूस त्याच हसणंच हरवून बसलेला आहे. कधीकधी एकएक दिवस न हसता आपण घालवतो. वास्तविक पाहता हास्य हे मानवजातीला मिळालेलं सगळ्यात मोठं वरदान आहे 1950 पर्यंत माणस म्हणे दिवसातुन अठरा मिनिटं हसायची आता ती सहा मिनिटं ही हसत नाही.. अशी जर स्थिती असेल तर माणसाला bp, diabetes सारखे आजार लागले तर त्यात आश्चर्य ते काय...
रोजच्या दैनंदिन जीवनातही कितीतरी दगडासाऱखी न हसणारी दिव्य आपल्याला भेटतात त्यांना बघून हा बिचारा
शेवटचा क़धी हसला होता याची मला तर चिंताच वाटते. याविरुद्ध काही लोक कायम मिश्कील विनोद करून स्वतःही हसणारे आणि दुसऱ्यांनाही हसवणारे असतात असे लोक सगळ्यांना हवेहवेसे वाटतात. कुणीतरी म्हटलं आहे की, man is born for suffering हे जरी खरं असल तरी हास्याने आणि हलक्याफुलक्या विनोदानी आपण आपलं दोन दिवसाच आयुष्य सुखावह करू शकतो.
माझं विचाराल तर मला तर न हसणारे लोक बघितले कि ताण आल्यासारखं होतं… वाटत काय कराव म्हणजे हा मनुष्य हसेल आणि दुसऱ्याला आनंदाने जगू देईल.. काही व्यक्ती तर born to give tensions to others अ़शात तोऱ्यात मिरवत असतात.. दोन लाेकं जर हसताना दिसले तर काहितरी डोक्याला ताण देण्याऱ्या गोष्टींचा विषय काढला कि त्यांना बरे वाटते… काहि लाेक तर या विश्वाची चिंता फक्त मीच वहातो अशाच आवेशात असतात… असो पण अशा व्यक्तींपासुन सगळे दूरच पळतात… त्यामुळे कितीही ताण असला तरी वेळ गेली कि सगळ नीट होईल असा सकारात्मक विचार करायचा आणि देवाने दिलेला प्रत्येक दिवस हा मला मिळालेला बोनस आहे असं समजून हसावे आणि हसवावे.. दिवसातून एकदा तरी खळाळून हसले की बघा कसे हलकेच झाल्यासारखे वाटते…
शेवटी काय तरं”तुझे हसूं आरशात आहे…”

लेखन:जयंती देशमुख,
अकोला