बलिदान दिनानिम्मित धावपट्टु ओमकार स्वामी यांच्यासह लातूरच्या 4 तरुणांनी तब्बल 120 किलोमीटर अंतर धावण्याचा संकल्प पूर्ण केला…!
लातूर,-(प्रतिनिधी)
महान क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधुन व तसेच वसुंधरारत्न परमपूज्य राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त आयोजित लातूर ते कपिलधार तीर्थक्षेत्र ( मांजरसुंबा, बीड ) असा तब्बल 120 किलोमीटर चा अंतर धावत जावून पूर्ण करण्याचा संकल्प लातूरच्या तरुणांनी आज पूर्ण केला.
आंतरराष्ट्रीय अल्ट्रामॅरेथॉन धावपट्टु ओमकार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील गणेश बोनवळे, अजय गायकवाड, माधव इटकर व प्रणव नलवडे या चार धावपटूंनी या मोहिमेत सहभाग नोंदवून परिसरातील तरुणांमध्ये देशाप्रती व आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारी शहीदांबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने ही मोहीम पूर्ण करण्यात आली.
तरुणांनी व्यसनाच्या विळख्यात न अडकता, देशाप्रती सेवा व समर्पणाची भावना मनात ठेऊन पुढे आल पाहिजे व आपल्या कर्तत्वातुन आपल्या देशाचा व भारतीय संस्कृतीचा सर्वांना अभिमान वाटेल असे कर्म करण्यासाठी तरुणांनी सदैव कार्य तत्पर राहायला पाहिजे असे मत धावपट्टु ओमकार स्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले…
धावपट्टु ओमकार स्वामी यांनी या अगोदर साकोळ ते बसवकल्याण तसेच लातूर ते तुळजापूर अशा मोहिमेचे आयोजन करून तरुणांमध्ये स्फूर्ती व देशप्रेम उफाळून यावे यासाठी ते पुरेपूर प्रयत्न करतात.