26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeआंतरराष्ट्रीय*पाशा पटेल यांचा सन्मान*

*पाशा पटेल यांचा सन्मान*

*जागतिक पर्यावरण परिषदेत पाशा पटेल यांचा

 सन्मान*

पर्यावरण संरक्षण  शेतकरी हितासाठी झटणारे पाशा पटेल यांचे कार्य अद्वितीय – नाआठवले

 

*सन्मानामुळे जबाबदारी वाढलीपटेल*

पर्यावरण संरक्षण आणि शेतकरी हितासाठी आपण देत असलेल्या लढ्याची दखल घेत केलेल्या सन्मानाबद्दल मी संस्थेचा आभारी आहे. ज्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासह शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी धडाडीने काम करणाऱ्या व्यक्तींचा आज सन्मान करून तुम्ही माझी जबाबदारी वाढवली आहे आणि ती मी आपणा सर्वांच्या सहकार्याने पेलेल, अशी ग्वाही पाशा पटेल यांनी सत्काराला उत्तर देताना दिली.

*दिल्ली/प्रतिनिधी* – पाशा पटेल यांचे पर्यावरण संरक्षण आणि शेतकऱ्यांसाठी लढा हे कार्य अद्वितीय असून, ते देशभर बांबू लागवडीसाठी करीत असलेल्या प्रचार आणि प्रसारामुळे पर्यावरण संतुलनाबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट होईल, त्यांचा या कार्याला सर्वांनी सहकार्य करावे पाशाजी माझे 25-30 वर्षांपासून मित्र आहेत असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.   राजधानी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये दिनांक 15 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर एनजीओ म्हणून काम करणाऱ्या राष्ट्रीय नागरी व पर्यावरण या संस्थेच्यावतीने आयोजित जागतिक पर्यावरण परिषदेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते संपूर्ण महाराष्ट्रात बांबू लागवडीला प्रोत्साहन देत लातूर येथे बांबू संशोधन केंद्र उभारून महाराष्ट्रात 12 कोटी रोपे लावण्याचे व्रत घेतलेल्या पाशा पटेल व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेविंचा सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष विजयराजे धमाल आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

      ना. आठवले पुढे म्हणाले की, सामाजिक आणि पर्यावरण संरक्षणाचे कार्य हाती घेऊन पाशा पटेल यांनी चालवलेली चळवळ तसेच शेतकऱ्यांसाठी देत असलेला लढा हा निश्चितच प्रेरणादायी आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडत चालल्याने अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यापैकी वायू प्रदूषण ही मोठी समस्या बनली आहे. इंधन म्हणून वापरले जाणारे पेट्रोल , डिझेल, दगडी कोळसा या घटकांना पर्याय शोधण्यात केंद्र सरकार सातत्याने विचार करत असून, पेट्रोल, डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर सुरू करण्यात येत आहे, दगडी कोळश्याला पर्याय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांबू वापराचे आवाहन केले आहे, त्यांची ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पाशा पटेल यांनी देशभरात हजारावर सहभाग घेऊन जनजागृती सुरू केली आहे, त्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत आपल्या हातून पाशाभाई यांचा आज सत्कार होतो आहे, याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगून ना. रामदास आठवले यांनी त्यांच्या या अभियानाला शुभेच्छा दिल्या.  सत्काराला उत्तर देताना तसेच उपस्थितांना बांबू लागवडीबाबत मार्गदर्शन करताना पाशाभाई म्हणाले की, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी बांबू लागवड अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. बांबूपासून इथेनॉल निर्मितीही शक्य झाली आहे. कोविड काळात ऑक्सीजनचे महत्व सर्वांना समजले आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक जिल्ह्यात रुग्णांना समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. बांबूचे एक झाड वर्षाकाठी 300 किलो ऑक्सिजन निर्माण करते. सोबतच बांबू हा बहुगुणी वृक्ष आहे, असे सांगून ते म्हणाले की, प्रत्येक राज्यातील किमान एक तरी औष्णिक वीज निर्मिती केंद्रात 10 टक्के बांबू अथवा जैवभाराचा वापर बंधनकारक करण्याबाबतच्या केंद्र परिपत्रकानंतर आपण सातत्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्याचीच फलश्रुती म्हणजे परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात दगडी कोळश्याबरोबर इंधन म्हणून बायोमास ब्रिकेट अर्थात बांबूच्या तुकड्यांचा वापर करण्यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले असून, त्या अनुषंगाने या केंद्राच्या महानिर्मिती विभागातर्फे बांबू पुरवठ्यासाठी 15 दिवसापूर्वी निविदा काढण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]