पंजाब कॉंग्रेस बदलाचा अन्वयार्थ

0
251

काँग्रेस एक पाऊल पुढे… अजून बरीच पडायला हवीत…

पंजाब काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष पद मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या मनाच्या विरोधात जाऊन नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडे देण्याचं जे धाडस काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी दाखवलं आहे ते एक पाऊल पुढं आहे.. एवढंच नाही तर जवळपास सर्व खासदारांच्या ही इच्छेच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेण्यात आला, तो राबवण्यात आला..

आज अमरिंदर सिंग हे 79 वर्षांचे आहेत.. सक्षम असतील ही पण जे सिद्धू सारखे इतर ही सक्षम, गुणवंत लोक आहेत त्यांनी काय करायचं? त्यांना ही संधी द्यायला हवी स्वतःला सिद्ध करण्याची.. जी की काँग्रेसने दिली.. अशी चर्चा आहे की हा सगळा दबाव झुगारून हा कणखर निर्णय घेण्यामध्ये प्रियांका गांधी यांची मोठी भूमिका आहे..

मला अस वाटत की प्रशांत किशोर यांची जी सोनिया गांधी, प्रियांका आणि राहुल गांधी यांच्या सोबत जी बैठक झाली त्यात राज्यातील सध्य परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसारच हा बदल केला गेला असावा.. काही सर्व्हे सुद्धा अमरिंदर सिंग यांच्या घटत्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब करत होते.. प्रश्न होता तो फक्त दबावा पुढे न झुकण्याचा, त्याला झुगारून देण्याचा, तो प्रियांका यांनी धारिष्ठय दाखवून केला अस वाटत..

असेच निर्णय, अस एक पाऊल पुढे अनेक राज्यात काँग्रेसने घेण्याची गरज आहे.. असाच एक निर्णय काँग्रेसने महाराष्ट्रात नाना पटोले यांच्या रूपाने घेतला तर त्याचे चांगले परिणाम पुढे येत आहेत.. राजकीयदृष्ट्या कोणाच्या मोजमापात न राहिलेला काँग्रेस पक्ष, 4 नंबर वरून सरळ चर्चेत 1 नंबर वर नानांनी आणून ठेवला.. सतत कार्यमग्न राहून संघटनेत चैतन्य आणले तर सतत आवश्यक आणि ठाम भूमिका घेऊन पक्षाला मीडियात चर्चेत ठेवले.. तुम्ही जर बातमी पुरवण्याची ताकद ठेऊ शकत असाल, चर्चा घडवून आणणारी विधान करू शकत असाल तर तुम्हाला media space मिळतो हे नानांनी सिद्ध करून दाखवले आहे.. आता फक्त निवडणूक निकालात हे सगळे कष्ट फळाला आले की जमलं.. ईश्वर त्यांच्या प्रयत्नांना यश देवो..

हे अमरिंदर सिंग यांच्या सारखे जेवढे ही राज्य स्तरावरील नेते आहेत ज्यांनी की आयुष्यभर पक्षाला दिलं आणि पक्षाकडून घेतलं ही, त्यांनी आता दिल्लीत येऊन पक्षाची सेवा केली पाहिजे आणि राज्य हे तरुण नेत्यांना मोकळं सोडलं पाहिजे. त्यांना काम करू दिलं पाहिजे, त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांना आपल्या पंखाखाली घेऊन भरारी घेऊ दिली पाहिजे.. मन मोठं दाखवल पाहिजे.. आयुष्यभर भोगल की, आता तरी द्या.. परत करा.. पक्षाला.. त्याची ही गरज ओळखा.. म्हातारपणी लोक परमार्थाला लागतात, स्वार्थ त्यागतात अस म्हणतात, ते खरं करा.. स्वतःच्या जीवावर सत्ता आणू शकतो, मी नसेल तर येणार नाही हा पराक्रमाचा भाव कोणीही ठेऊ शकतो, पण दुसऱ्याला पुढं करून सत्ता आणा, विजय मिळवा, तो खरा पराक्रम..

चाणक्य बना, कोणाला तरी चंद्रगुप्त बनवा..

राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश अशा अनेक राज्यात याची गरज आहे.. तुमचं वय तर वाढल पण तुम्ही मोठे झाले नाहीत, मोठेपण तुमच्यात आलं नाही अस दुर्दैवाने म्हणावे लागेल.. मोठे व्हा, वर जा, दिल्ली गाठा आणि नवीन लोकांना राज्यात मदत करा.. भोगून झालं हे सगळं, आता झोकून द्या.. पक्षाने ही हा निर्णयाचा पंजाब पॅटर्न देशात राज्य राज्यात राबवावा.. यश नक्की मिळाले.

लेखन: अभिजित देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here