भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार..
निलंगा,-( प्रतिनिधी )-
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांंचा वाढदिवस दि.9 रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
प्रदेश सचिव अरविंद पाटील निगेकर यांचा प्रवास शैक्षणिक ते राजकीय क्षेञात काम करताना समाजसेवेला अनन्य साधारण महत्त्व असल्याची जाणिव त्यांना आहे.लातूर येथील अटल महाआरोग्य शिबीर,निलंगा येथील हरित शिवजयंती महोत्सव,निलंगा येथे अभुतपूर्व अशा प्रकारचे लोककल्याणकारी विश्वशांती महायज्ञ असेल,वृृृक्षलागवड,इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान असेल,अशा अनेक उपक्रमांनी आपला वेगळा ठसा उमटविणारे प्रदेश सचिव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न होणार आहे.
पुठील प्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 06 वाजता ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिर निलंगा येथे अभिषेक,7 वाजता बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्प अर्पण,8 वाजता छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण,8:30 दादापीर दर्गा व पिरपाशा येथे चादर चढविणे,9 वाजता हुतात्मा स्मारक येथे पुष्प अर्पण,10 उपजिल्हा शासकीय रूग्णालय निलंगा येथे रूग्णांना फळ वाटप,प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रूग्णास फळे वाटप,पालावरची शाळा येथे वह्या वाटप तसेच,दुपारी ठिक 1 वाजता प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांचा भाजपा परिवाराच्या वतीने केक कापून जनसेवा कार्यालय येथे सत्कार केला जाणार आहे.तरी,भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे,असे भाजपा निलंगा तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.