निलंग्यात रक्तदान महायज्ञाला तरूणाईचा उत्सफुर्त प्रतिसाद
अक्का फाँडेशन व सार्वजनिक शिवजयंती मोहत्सवाच्या निमित्ताने ५५१ विक्रमी रक्तदान
निलंगा,-(प्रशांत साळुंके )-
छपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्त अक्का फाँडेशन व सार्वजनिक शिव जमोत्सवाच्या निमित्ताने निलंग्यात तरूणाईने उत्सफुर्त प्रतिसाद देत विक्रमी रक्तदान केले.
प्रतिवर्षाप्रमाणे अक्का फाँडेशन व सार्वजनिक शिव जमोत्सवानिमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात शहरात रांगुळी स्पर्धा,हरीत शिवजयंती,तैलचिञ,बारा बलुलेदारांच्या हस्ते शिवगर्जना अभिषेक यासह अदी उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी रक्तदानाचा महायज्ञ् छञपती शिवाजी चौकात राबविला यात ५५१ रक्तदात्यानी आपले रक्तदान करून सामाजिक कार्याचा विक्रम केला आहे.
दिनांक १९ रोजी सकाळी ८ वाजता माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर युवानेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज चौकात महाअभिषेक व ध्वजारोहन करण्यात आले.त्यानंतर रक्तदान महायज्ञाचेही निलंगेकर यांच्या हस्ते रीबीन कापून उदघाटन करण्यात आले.या रक्तदान शिबीराला निलंगा देवणी शिरूरअनंतपाळ येथील तरूणांचा मोठा प्रतिसाद होता.भालचंद्र ब्लड बँकेच्या वतीने हा कँप आयोजित करण्यात आला होता. निलंगा येथे अक्का फाँडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या या रक्तदानाच्या महायाज्ञात ५५१ रक्तदात्यानी रक्तदान करून विक्रमी मतदान केले आहे.
माजी नगरध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,संजय दोरवे,चेअरमन दगडू सोळुंके,डॉ.लालासाहेब देशमुख,दत्ता शाहिर,डॉ शेषराव शिंदे शेषराव ममाळे,रवि फुलारी,प्रदीप पाटील,अप्पाराव सोळुंके,ईरफान सय्यद,विरभर्द स्वामी,मनोज कोळ्ळे,विनोद सोनवणे,डॉ किरण बाहेती,डॉ समीर तळीखेडकर,डॉ नितीन जाधव,किशोर लंगोटे,सुमीत इनानी,प्रकाश पटणे,शंकरप्पा बुरखे,रमेश तेलंग,कुमोद लोभे,किशोर,कविता तोष्णीवाल जाधव,बाळासाहेब पाटील,प्रशांत पाटील,तम्मा माडीबोने,तानाजी बिरादार,प्रणीता केदारे,नयन माने,सचिन गायकवाड अदीने या रक्तदान महायज्ञासाठी परिश्रम घेतले.