वाढदिवस विशेष
या देशाचा एक सर्वसाधारण नागरिक म्हणून जेंव्हा मी भारताकडे बघतो आणि स्वत:ला या राष्ट्राशी जोडू लागतो तेंव्हा भारताचं बदलतं स्वरूप माझ्या डोळ्यांसमोर येवून टिपतं. कालच्या आणि आजच्या भारतामध्ये विकासाची व्याख्या बदलताना दिसते. विकास म्हणजे काय ? असा प्रश्न जेंव्हा मला पडतो, तेंव्हा या विशाल देशाचे उत्कृष्ट आणि लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजींचा “शून्य से शिखर तक” चा प्रवास आठवतो. देश बदलतोय असं मी ठामपणे म्हणू शकतो कारण भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोण बदलतोय. २०१४ पासून भारताने केवळ स्वतःच्या समस्या मांडल्या नाहीत तर इतर विकसनशील देश, अल्पभूधारक, गरीब आणि असुरक्षित घटकांच्या समस्या देखील अत्यंत संवदेनशीलतेने मांडल्या. आता जग भारताकडे अपेक्षेने, विश्वासाने आणि कौतुकाने बघू लागले आहे.
हे सगळं शक्य करणारे आणि प्रत्यक्षात नव्या भारताचा चेहरा रंगविणारे अत्यंत लोकप्रिय, निर्भीड आणि संवेदनशील पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचा परिचय करून देण्याची मला इथे गरज वाटत नाही. कारण ज्या व्यक्तीने विकासाला आपले धोरण बनविले, संघठन ला आपली शक्ती बनवली, लोकशाहीला आपले शस्त्र बनविले आणि प्रेरणेनेला आपली ऊर्जा बनविली अश्या लाडक्या ‘नरेंद्र मोदीजी’ यांनी कार्यातून सिद्धी गाठली आहे. ‘आपले कार्य हीच आपली ओळख’ या उक्तीवर विश्वास ठेवणार्या मोदीजींनी आज प्रत्येक भारतीयांच्या मनात घर केले आहे. “जेव्हा स्वप्न मोठी असतात तेंव्हा ती पूर्ण करण्याच्या निमीत्ताने हातून मोठे कार्य घडते” असे मत असणार्या मोदींनी देशाचा नवा नक्षा तयार केला आहे.
भारत लोकशाहीची जननी आहे. ज्याने विश्वाला लोकशाहीचे धडे शिकविले त्याच भारताला ट्रिपल तलाक, आर्टिकल ३७० आणि भ्रष्टाचार अश्या अनेक प्रश्नांनी त्रस्त केले. परंतु हे सर्व प्रश्न मोदी काळातच सुटले. मोदी सरकारने सत्ता, पद आणि प्रतिष्ठा याच्या पलीकडे जावून जनसेवेलाच धर्म मानला आणि धडाडीच्या निर्णयांनी देशाचे मनोबल वाढविले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची अनेक रूपं आहेत, याची जाण मोदी सरकारला आहे आणि म्हणूनच अर्थ व्यवस्था, परराष्ट्र धोरण, संस्कृती, कला, साहित्य, अध्यात्म, पर्यावरण, जैवविविधता, कृषी, उद्योग, व्यवसाय अशा अनेक आयामांमध्ये आपल्या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयांपर्यंत ‘नवा भारत’ पोहोचविला.
स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाव-बेटी पढ़ाओ, मेक इन इंडिया, पी.एम मुद्रा योजना, स्किल इंडिया मिशन, उज्वला गॅस योजना, स्मार्ट सिटी, डिजीटल इंडिया, नमामि गंगे ही उदाहरणे फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील वर्णीत आहेत. विचार, वचन आणि कर्म या तिघांची सांगड घालून देशाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या दिशेने नेणारे मोदी कुशल नेते तर आहेतच पण नव्या भारताचे नवे शिल्पकार म्हणूनही ओळखल्या जात आहेत. आपल्या कुशल नेतृत्वातून त्यांनी भारताला नवीन ओळख मिळवून दिली आहे आणि यापूढेही ‘पंचप्राण’ शक्तीच्या जोरावर भारत अमृत काळात विश्वगुरु बनेल याची मला खात्री आहे.
वर्तमान स्थितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत . ज्यात प्रामुख्याने पी एम फसल बीमा योजना, पी.एम किसान या योजनांचा देशभरातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होत असताना दिसत आहे .पी.एम. फसल बीमा योजने अंतर्गत 11,42,07,960 शेतकरी कृषी क्षेत्रात प्रगती करत आहेत. देशभरातील बीज लागवड, उत्पन्न, कृषी बाजारपेठ, पीक वीमा टप्पा-टप्प्याने शेतकरी समृद्ध करण्यासाठी अथक परिश्रम घेतल्या जात आहेत. प्रधानमंत्री ग्राम सड़क योजने अंतर्गत भारतातील 3,28,261 कि.मी लांबीचे रस्ते प्रमुख्याने गावांना जोडत आहे. याचा फायदा खेड्या पाड्यातील नागरिकांना होत आहे . जन आरोग्य योजना प्रधान मंत्री भारतीय जन औषधी परियोजना प्रामुख्याने ओळखल्या जात आहे. प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा योजना तर 13,23,00,000 लोकांपर्यंत पोहचली आहे . ‘हागणदारी मुक्त भारत’ या मिशन ने जग भरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. एकूण 1,07,441 ग्रामीण गावे हागणदारी मुक्त होवून स्वच्छते कडे पाऊल उचलत आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,53,19,705 इतक्या बेघरांना हक्काची मजबुत घरे दिली. देशातील युवकांना बळकट करण्यासाठी स्टार्ट अप मिशन आणि मुद्रा योजना वर्णित आहे. डिजिटल इंडिया च्या माध्यमातून संपूर्ण देशाला डिजिटल प्लॅटफॉर्म वर देशातील योजना उपलब्ध आहे.
कोवीड असो किंवा जागतिक मंदी अशा कठीन परिस्थितीतून भारताला उंचविणारे मोदी यांची किमया फक्त एका लेखाद्वारे मांडणे अशक्यच. परंतु त्यांच्या व्यक्तीमत्वातल्या अनेकानेक गुणांचा अभ्यास आपण नक्कीच करायला हवा. भारताला मोदीच पंतप्रधान लाभावे असे मला वाटते. कारण ‘बूरे से अच्छे आणि अच्छे से बेहतरीन’ हा प्रवास फक्त मोदीच करु शकतात.
उदंड आयुष्य, उत्तम प्रकृती, आणि आभाळाऐवढे सामर्थ्य असेच लाभत राहावे याच सदिच्छेने देशाच्या लोकप्रिय पंतप्रधानांना आणि आमच्या लाडक्या माननीय श्री. नरेंद्र मोदीजींना वाढदिवासाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
जीवेत शरद: शतम् ….!!!
आ. रमेश कराड
जिल्हाध्यक्ष,
भारतीय जनता पार्टी, लातूर ग्रामीण जिल्हा