डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंतीदिनानिम्मित-
द्वारकादास शामकुमारच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन व खिचडीचे वाटप
लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून येथील अंबेजोगाई रोडवरील द्वारकादास शामकुमार वस्त्रदालनाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे शुक्रवारी सकाळी नागरिकांसाठी पाणपोईचे उदघाटन करण्यात आले. तर सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत खिचडीचे वाटप करण्यात आले. द्वारकादास शामकुमार ग्रुपच्या वतीने मागच्या अनेक वर्षांपासून डॉ. आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून नागरिकांसाठी पाणपोई चालविण्यात येते. आंबेडकर जयंतीदिनी सुरु झालेली ही पाणपोई उन्हाची दाहकता जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत अव्याहतपणे चालवली जाते.
नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येते. दररोज थंङ पाण्याचे किमान ४० ते ५० जार लागतात. ज्या समाजाच्या सहकार्याच्या बळावर आपण व्यवसायात एवढी उत्तुंग भरारी घेऊ शकलो, त्या समाजाचे ऋण फेडणे कदापि शक्य नसले तरी त्यातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून द्वारकादास शामकुमारचे संचालक तुकाराम पाटील, राजूभाऊ पाटील, तुकाराम पाटील मित्र परिवाराच्या वतीने असे सामाजिक उपक्रम नियमितपणे राबविले जातात, हे सर्वज्ञात आहे.
पाणपोईच्या उद्घाटनासाठी दिशा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते अभिजीतभैय्या देशमुख, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव गायकवाड, उपप्राचार्य नागरगोजे, उपप्राचार्य माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्प अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी आपलं;ए विचार व्यक्त करताना अभिजित देशमुख म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील वंचित घटकांची ज्ञानाची तहान भागविण्याचे महान कार्य केले आहे.
त्याप्रमाणे समाजातील तहानलेल्या व्यक्तींची पाण्याची तहान भागविण्याचे काम तुकाराम पाटील मित्रपरिवार मागच्या अनेक वर्षांपासून करता आहेत ही अत्यंत समाधानाची बाब आहे. महामानवाचे विचार समाजाला कायम प्रेरणा देण्याचे काम करीत असतात. त्यांच्या क्रांतिकारी विचारानेच वैचारिक क्रांती साधली जाते,असेही त्यांनी सांगितले. प्राचार्य गायकवाड, दयानंद पाटील यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे विस्तृत प्रास्ताविक प्राचार्य निलेश राजेमाने यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संभाजी नवगरे यांनी तर आभार प्रदर्शन पत्रकार शशिकांत पाटील यांनी केले. याप्रसंगी डॉ. राम बोरगावकर,प्राचार्य बाबुराव जाधव,डॉ. सुदाम पवार, संतोष बिराजदार, एड. दासराव शिरूरे , असिफ शेख, पत्रकार इस्माईल शेख, माळी गुरुजी, माऊली माने, अमोल चामे, उफाडे पाटील, रमेश बिराजदार, सोनू डगवाले यासह अनेक मान्यवरांची तसेच द्वारकादास उपस्थिती होती. सायंकाळी सदानंद माडेवार , डॉ. राम बोरगावकर, शशिकांत पाटील, तुकाराम पाटील, प्राचार्य निलेश राजेमाने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. खिचडी वाटप करताना अविरतपणे समाजाची सेवा करणाऱ्या पोलीस बांधवांपासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर रात्री अकरा वाजेपर्यंत समाजातील विविध स्तरातील नागरिकांनी खिचडीचा लाभ घेतला.