लातूरदि.22 ; ( प्रतिनिधी) -श्रीमती द्रोपदी मुर्मूजी यांनी अनेक संकटावर मात करत देशातील महिलांना दीपस्तंभा प्रमाणे प्रेरणा दिली. उच्च शिक्षण घेऊन दलीत व आदिवासी समाजासाठी त्यांनी कार्य केले.आदिवासी समाजातल्या पहिल्या व दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला आहे. त्यामुळे श्रीमती द्रोपदी मुर्मूजी यांचा आदर्श ठेवून आदिवासी मुलांनी अभ्यास करावा व शैक्षणिक प्रवाहात यावे असे आवाहन राज्य मंडळ सदस्य डॉ. संदीपान जगदाळे यांनी केले.
पुढे ते म्हणाले की,”हजारो वर्षांपासून वंचित असलेला आदिवासी समूह स्वातंत्र्य नंतरही उपेक्षितच होता.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू असतानाच देशात अनुसूचित जमाती प्रवर्गातील एक महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होते हा खऱ्या अर्थाने सदृढ लोकशाहीचे लक्षण आहे.”
लातूर शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या बाभळगाव जवळ एक गौड आदिवासी वस्ती आहे.
दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विषयाचे प्राध्यापक व राज्य मंडळ सदस्य डॉ. संदिपान जगदाळे हे मागील अनेक महिन्यांपासून तेथे जाऊन सामाजिक दायित्व म्हणून मोफत अध्यापनाचे कार्य करीत आहेत.तेथील ६० झोपड्यात जाऊन तेथे शाळाबाह्य विद्यार्थीचे सर्वेक्षण केले.तेथील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावेत यासाठी ते प्रयत्नशील आहेत.त्यांनी तेथील विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तकांचे वितरण केले. त्यांना संगीत व योग-प्राणायामाचे धडे देत आहेत.
श्रीमती द्रोपदी मुर्मूजी यांच्या विजयाची घोषणा होतात संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण पसरले.त्याचाच भाग म्हणून डॉ. संदिपान जगदाळे यांनी सुद्धा बाभळगाव जवळील गौंड आदिवासी वस्तीवर जाऊन तेथील प्रत्येक घरातील सदस्यांना पेढे वाटून व रंगीबेरंगी फुगे देऊन त्यांना ही आनंदवार्ता सांगितली व त्यांचे अभिनंदन केले. तसेच प्रभात फेरी काढून द्रौपदी मुर्मूजी या राष्ट्रपती झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिराज जगदाळे, कृष्णा घोळसे व त्रिमुख इगवे यांनी परिश्रम घेतले.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमन लाहोटी, सरचिटणीस रमेश बियाणी,संयुक्त सचिव सुरेश जैन,प्र.कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, डॉ.गणपत मोरे,सुधाकर तेलंग,दत्तात्रय मठपती,प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड,उपप्राचार्य अनिलकुमार माळी,पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे,डॉ देवेंद्र कुलकर्णी,कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव यांनी अभिनंदन केले आहे