29.9 C
Pune
Tuesday, January 14, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*

*दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*

रेणा सहकारी साखर  कारखाना येथे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा.

लातूर (निवाडा) :– मांजरा परिवारातील साखर कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या सोबतच कारखाना स्थळावरील गणेश मंदिर व साईबाबा मंदिर,रेणापूर येथील रेणुका देवी मंदिर येथे आरती करून सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. यासोबतच पोहरेगाव येथे  सर्जेराव मोरे,शिरीष यादव,बब्रूवान पवार व संयोजन समितीच्या सदस्यांनी  सहकार महर्षी चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी कारखान्याचे  चेअरमन सर्जेराव मोरे,माजी आमदार त्र्यंबक भिसे,माजी चेअरमन यशवंतराव पाटील, व्हा.चेअरमन अनंतराव देशमुख,जिल्ह बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव,संचालक लालासाहेब चव्हाण,प्रविण पाटील,धनराज देशमुख,हणमंत पवार,संग्राम माटेकर,चंद्रकांत सुर्यवंशी,सतीश पाटील, गोविंदराव माने, बाळकृष्ण माने,इंदूताई इगे,कार्यकारी संचालक बी.व्ही मोरे, उद्धव चेपट जिल्हा परिषद सदस्य, अशोकराव पाटील माजी संचालक रेना, मतीन आली शहराध्यक्ष, मुरलीधर पडोळे, एडवोकेट शिरीष यादव ,पाशाभाई शेख, पदम दादा पाटील नगरसेवक, अनिल पवार नगरसेवक, भूषण पनुरे नगरसेवक, हनुमंत पवार सेवादल तालुका अध्यक्ष, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष पूजाताई इगे ,माणिकराव सोमवंशी नागनाथ कराड तुकाराम कोल्हे, गोविंदराव पाटील, अनिल पवार कुमार पाटील जवळगा, बालासाहेब करमुडे विद्यार्थी तालुका काँग्रेस अध्यक्ष ,राम शिंदे, प्रवीण माने सरपंच कारेपूर ,राजाभाऊ साळुंखे, दिलीप आप्पा उरगुंडे, अजय चक्रे, बाळकृष्ण मोरे पोहरेगाव सरपंच राजकुमार पाटील कामखेडा सरपंच शिवाजी गाडे ,प्रभाकर केंद्रे, श्रीखंडी हरवडीकर प्रकाश सूर्यवंशी, अॅड  प्रशांत आकनगिरे, अॅड तानाजी कणसे कमलाकर आकनगिरे इतर गावातील काँग्रेस कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.

सहकार महर्षी दिलीपरावदेशमुख यांचा वाढदिवस विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना येथे सामाजिक उपक्रमाने साजरा.

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना येथे  सामाजिक उपक्रमाने साजरा. 
विलासनगर :– राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.

दि.१८ एप्रिल २०२३रोजी मांजरा कारखाना येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 155 रक्तदात्यांनी रक्तदान केले.तसेच कारखाना परिसरात वावर असलेल्या वन्यजीवासाठी पिण्याचे पाण्याची सोय करून देण्यात आली.यासोबतच मातोश्री वृध्दाश्रम येथे अन्नदान करण्यात आले.

मांजरा परिवारातील साखर कारखान्यास योग्य मार्गदर्शन करून सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी सर्वसामान्यांच्या जिवनात क्रांती आणली त्यांच्या हातून समाजाची निरंतर सेवा घडावी यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी कारखान्याचे व्हा चेअरमन श्रीशैल उटगे, सन्माननीय संचालक मंडळ व सर्व खाते प्रमुख कर्मचारी आदींची उपस्थिती होती.


विलास कारखान्याच्या वतीने शासकीय रूग्णालय येथील रूग्णांना आणि मातोश्री
वृध्दाश्रम येथे भोजनाची व्यवस्था उपक्रमाचे आयोजन


     माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या
वाढदिवसानिमित्त विलास सहकारी साखर कारखाना लि. वैशालीनगर, निवळीच्यावतीने मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी विलासराव देशमुख शासकीय वैदयकीयरूग्णालय येथे रूग्णांना व मातोश्री वृध्दाश्रम येथे ज्येष्ठ नागरीकांनाभोजनाची व्यवस्था उपक्रमाचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.


सहकार महर्षी, माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी देशमुख एक बहूआयामी नेतृत्वआहे. मराठवाडयातील बाभळगाव येथील शेतकरी कुंटूबात ग्रामीण भागात त्यांचाजन्म झाला. गावच्या सरपंच पदापासून राज्याचे मंत्री म्हणून काम करतांना
सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी उभारलेल विविध क्षेत्रातील काम पाहताअसे दिसून येते की, लातूर जिल्हयात एक नवीन काम उभा करणे गरजेचे आहे. याजाणीवेने त्यांच्या कार्याची सुरूवात झाली. अगोदर येथील सामाजिक वातावरण
आणि विकासासाठी काय करणे गरजेचे आहे, याचा विचार करून त्यांनी पाऊलेटाकली. एकाएका पदावरून पायरी-पायरीने पुढे जात असतांना विकासाची त्यांनीनियोजनबद्ध आखणी केली. यामूळे पक्ष संघटना, सहकार, साखर उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्था, जलव्यवस्थापन, दुष्काळ, सिंचन क्षेत्र, शिक्षण, क्रीडा,पर्यावरण यासर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या कामाची उभारणी केली.


लातूर जिल्हयातील सहकार व साखर उदयोगातील संस्थाचे त्यांनी उत्कृष्टनियोजन केले आहे. त्याचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून विलास कारखाना स्थळी साजरा करण्यात आला. माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री,आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने विविध उपक्रमाचे आयोजनकरण्यात आले. मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय रूग्णालय येथे रूग्णांना एकवेळचे भोजनाची व्यवस्था करण्यात आली.तसेच मातोश्री वृध्दाश्रम लातूर येथे एकवेळचे भोजन देण्यात येणार आहे.
   यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक सजीव देसाई, संचालक गोविंद बोराडे, अनंत बारबोले, अमृत जाधव,बाळासाहेब बिडवे, गोविंद डूरे, नारायण पाटील, संजय पाटील खंडापूरकर,सुभाष माने, सूर्यकांत सुडे आदी उपस्थित होते.

दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस
लातूर शहर जिल्हा काँग्रेस कडून विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा


माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस मंगळवार दि. १८ एप्रिल रोजी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून विविध सामाजिकउपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.सहकार महर्षी, आदरणीय दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहरजिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सकाळी लातूरचे ग्रामदैवत श्रीसिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थान या ठिकाणी श्रीचा अभिषेक करून तसेच ग्रामदैवत हजरत सुरत शाहवली दर्गा येथे चादर अर्पण करुन दिलीपराव
देशमुख यांना उदंड, निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अखंड जनसेवा घडो अशी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर लातूर शहरातील महानगरपालिका शाळा क्रमांक ९ या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले .


यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अँड. किरण जाधव, अँड. समद पटेल, गोरोबा लोखंडे, चांदपाशा इनामदार, चंद्रकांत धायगुडे, पृथ्वीराज सिरसाट, राजकुमार जाधव, दगडुअप्पा मिटकरी, अँड.फारुख शेख, कैलास कांबळे,
अँड.देविदास बोरूळे पाटील, रमेश सुर्यवंशी, प्रा.प्रवीण कांबळे, संजय म्हेत्रे, महेश काळे, नेताजी बादाडे, इसरार पठाण, अँड.अंगदराव गायकवाड,बालाजी झिपरे, अभिषेक पतंगे, अकबर माडजे, विष्णुदास धायगुडे,प्रा.एम.पी.देशमुख, अविनाश बट्टेवार, अब्दुल्ला शेख, अँड.दिनेश रायकोडे,प्रमोद जोशी, युसूफ बाटलीवाला, धनराज गायकवाड, अमोल गायकवाड, किरणपवार,अशोक सूर्यवंशी, शेख गौस, पंकज देशमुख, सचिन कोटवाडे, पिराजी साठे, करीमतांबोळी, रोहित वडरूले यांच्यासह लातूर शहरजिल्हाकॉंग्रेसकमिटीचेपदाधिकारी,सदस्य, मान्यवर उपस्थित होते.
—————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]