महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी
माजी आमदार अमित विलासराव देशमुख व
लातूर ग्रामिणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांची घेतली भेट
लातूर ;- (प्रतिनिधी ): सोमवार दि. २५ मार्च २०२४
लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी सोमवार दि. २५ मार्च रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची व लातूर ग्रामिणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांची सहकाऱ्यांसह घेतली.
डॉ. शिवाजी काळगे यांना अभिनंदन करून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांची प्रतिमा, असा घडला भारत हा ग्रंथ भेट देऊन या लोकसभा निवडणुकीत ते निश्चितपणे विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला .
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर दीपक सूळ, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे,डॉ.अशोक पोतदार, डॉ. सतीश बिराजदार, डॉ.राजकुमार दाताळ, डॉ.दीपक गुगळे,डॉ.संजय पौळ, डॉ. दीपक मसलेकर, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, राजकुमार जाधव, प्रवीण सूर्यवंशी, लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इमरान सय्यद आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.