ऍनालिसिस ऑफ ऍकॉस्टिक फीचर्स ऑफ सिंगिंग व्हॉइस फॉर सिंगर आयडेंटीफिकेशन’ हा संशोधनाचा विषय
इचलकरंजी ; दि.३० (प्रतिनिधी ) –-येथील
डीकेटीई संस्थेच्या टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिट्युटच्या इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागातील प्रा. दिपाली ढंग यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरद्वारे इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विषयात डॉक्टरेट ही पदवी मिळाली. ‘ऍनालिसिस ऑफ ऍकॉस्टिक फीचर्स ऑफ सिंगिंग व्हॉइस फॉर सिंगर आयडेंटीफिकेशन’ हा त्यांचा संशोधनाचा विषय होता.
यासाठी त्यांना डॉ. शैला सुब्बरामन, माजी डीन अॅकॅडमिक्स वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग सांगली यांचे मार्गदर्शन मिळाले.
विविध गाण्याच्या कोणत्याही ओळीतून मूळ गायकाची ओळख पटवणे आणि ते मूळ गायकाने गायले आहे की अन्य गायकाने गायले आहे. याची पडताळणी करणे हे
डीकेटीई संस्थेच्या टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिट्युटच्या इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभागातील प्रा. दिपाली ढंग यांचे संशोधन कार्य होते. या संशोधनाबरोबरच त्यांनी मंगेशकर बहिणी व किशोर कुमार-अमित कुमार पिता-पुत्र यांच्या अनुवांशिक आवाजातील अनुवंशीक सारखेपणा यावरही संशोधन केले आहे.
या संशोधनाद्वारे नाते संबंधातील आवाजाच्या सारखेपणा विषयी अधिक प्रगत संशोधन करण्यासाठी पायाभूत माहिती मिळवून दिली आहे. तसेच त्यांनी गाण कोकिळा लता मंगेशकर यांच्या 62 वर्षाच्या कारकिर्दीतील 350 गाण्यांचा अभ्यास करुन, त्यांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यातील आवाजामध्ये झालेल्या फरकांवर संशोधन केले आहे. लता दिदींनी वर्षानुवर्षे आपला आवाज उत्तम राखण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे, त्यांचा आवाज दीर्घ काळ श्रवणीय होता हे या संशोधनाव्दारे स्टॅटिस्टिकल दृष्टया सिध्द केला आहे.
ढंग यांनी नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये चार शोधनिबंध प्रकाशित केले आहेत आणि पाच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचे कार्य सादर केले आहे. प्रा. दिपाली ढंग यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरद्वारे इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विषयात डॉक्टरेट ही पदवी मिळाली. ‘ऍनालिसिस ऑफ ऍकॉस्टिक फीचर्स ऑफ सिंगिंग व्हॉइस फॉर सिंगर आयडेंटीफिकेशन’ हा त्यांचा संशोधनाचा विषय होता.
यासाठी त्यांना डॉ. शैला सुब्बरामन, माजी डीन अॅकॅडमिक्स वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग सांगली यांचे मार्गदर्शन मिळाले
याबद्दल डिकेटीई संस्थेचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे व सर्व संचालकांनी अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डेप्युटी डायरेक्टर प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे यांनीही कौतुक केले.