नाथ संस्थानमध्ये आनंदोत्सव
मुंबई /सद्गुरु श्री. वीरनाथमल्लनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र औश्याचे पाचवे विठाधिपती सद्गुरू श्री गुरूबाबा महाराज औसेकर यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने किर्तन भजनातून समाज प्रबोधन संस्कार या कार्याबद्दल राज्य सांस्कृतिक पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. हा राज्यशासनाचा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार गुरूबांना मिळाल्याचे समजताच नाथसंस्थानच्या शिष्य- वारकरी समुहात आनंदउत्सव साजरा करण्यात आला.
शके १६९२ म्हणजे जवळपास २६० वर्षाहून अधिक काळापासून अद्वैत भक्तीतत्वतथा वारकरी संप्रदायाची धुरा नाथसंस्थानचे माध्यमातून औसेकर महाराज घराण्यांनी पाच पिठ्यापासून जपली सद्गुरू वीरनाथ महाराज, मल्लनाथ महाराज दासवीरनाथ महाराज, सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज औसेकर आणि विद्यमान पिठाधिपती सद्गुरू श्री. गुरूबाबा महाराज औसेकर अशी पावन परंपरा भगवत धर्म प्रसार प्रचाराचे अखंड कार्य करत आहे.
श्री. गुरूबाबा महाराज औसेकर यांनी पिता व गुरू श्री. ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांचेकडून १९८५ साली नाथसंस्थानच्या कार्याची धुरा हाती घेतली व या पंरपरेची मुख्य साधना असणारे चक्रीभजनाच्या किर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून जवळपास ३०-३५ वर्षे महाराष्ट्र आंध्र कर्नाटकात वारकरी संप्रदायाच्या अद्वेत भक्तीतत्वाचा प्रचार, प्रसार संस्कार, प्रबोधन, जनजागृती केली आहे. जीथे जीथे वारकरी तीथे तीथे औसेकर महाराजांचे नाव पोहचलेले असून गुरूबाबा- गहीनीनाथ महाराज औसेकर यांना ओळखत नाही असा वारकरी उभ्या महाराष्ट्रभर शोधुन सापडणार नाही.
आदरणीय श्री. गुरूबांना महाराष्ट्र शासनोन जाहीर केलेला हा पुरस्कार हा गुरूबाबांचा आमच्या नाथसंस्थानचा सन्मानत्तर आहेच पण त्याही पेक्षा वारकरी संप्रदायाची निस्पृह सेवा अविरत करणार्या धर्म पीठाचा त्यांच्या सर्व शिष्य परिवाराचा गौरव असल्याचे श्री. विठ्ठल रूक्मीणी मंदीर समितवे अध्यक्ष श्री. गहीनीनाथ महाराज औसेकर यांनी पुरस्कार मिळाल्याचे कळताच आमचे प्रतिनिधीशी बोलतांना आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र शासनाच सांस्कृतिक विभागाच्यावतीने जाहीर झालेल्या या पुरस्कारात सन्मानचिन्ह आणि एक लक्ष रू असे स्वरुप असून समाज प्रबोध, जनजागृती संस्कार या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा देण्यात येतो.
हा पुरस्कार जाहीर झालेबद्दल मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, लातूर जिल्हाचे पालकमंत्री तथा सांस्कृतिक कार्य मंत्री महोदयांचे मनस्वी आभार नाथसंस्थानच्या शिष्यवर्गानी व नाथ सेवा मंडळानी व्यक्त केले आहेत.