लातूर *दिनांक. 29/01/2024*( वृत्तसेवा) खून करून आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या सख्ख्या भावाला व आईला कुणाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली
दारू पिऊन सतत भांडण तक्रारी करणाऱ्या भावाचा गळा आवळून खून केला व त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचला मात्र पोलिसांच्या चौकशीत सदरचा प्रकार उघडकीस आला.
याबाबत थोडक्यात हकीगत अशी की दिनांक 28/01/2024 रोजी पोलीस ठाणे औसा येथे तक्रारदार सचिन बालाजी जाधव, राहणार तुंगी तालुका औसा याने पोलीस ठाणेला तक्रार दिली की, त्याचा लहान भाऊ योगेश बालाजी जाधव, वय 23 वर्ष याने त्यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वगैरे तक्रार वरून पोलीस ठाणे औसा येथे क्रमांक 13/2024 कलम 174 सीआरपीसी प्रमाणे आकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला.
अकस्मात मृत्यू दाखल होताच अकस्मात मृत्यूच्या चौकशीत औसा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमलदारांनी घटनास्थळास भेट देऊन बारकाईने पाहणी केली. तसेच खबर देणार व इतरांकडे कौशल्यपूर्वक सखोल विचारपूस केली तेव्हा आत्महत्याची माहिती देणारे व इतर नातेवाईकांचे सांगणे व घटनास्थळाची परिस्थिती यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून आली.
सदरची परिस्थितीची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यावर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे,उपविभागीय पोलीस अधिकारी औसा रामदास इंगवले यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे औसा चे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड व त्यांच्या टीम ने बारकाईने चौकशी व विचारपूस केली तेव्हा मयत योगेश बालाजी जाधव याने आत्महत्या केली नसून मयत योगेश हा दारू पिऊन शुल्लक कारणासाठी सतत भांडण तक्रारी करत होता. दिनांक 27/01/2024 रोजी त्याच्या शेतात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भाऊ सचिन बालाजी जाधव,व त्याची आई आणि मयत योगेश जाधव यांचेत कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी भाऊ सचिन बालाजी जाधव यांनी बाजूस पडलेल्या दोरीने योगेश जाधव याचा गळा आवळून खून केला व तो मयत झाल्या नंतर त्याला शेडमधील अळूला लटकावून योगेश याने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचे निष्पन्न झाले.
मयत योगेश बालाजी जाधव याला मारहाण करून त्याचा खून करून आत्महत्या असल्याचे भासविल्यावरून मयताचा भाऊ सचिन बालाजी जाधव, वय 26 वर्ष व ती ची आई यांच्या विरुद्ध गुरन क्रमांक 03/2024 कलम 302, 323, 182, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
औसा पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अतिशय कौशल्यपूर्वक तपास करून खून करून आत्महत्या केल्याचा बनाव रचणाऱ्या आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लोंढे, पोलीस अमलदार मोतीराम घुले, रामकिसन गुट्टे, दिनेश गवळी, कदम, तूमकुटे , गायकवाड,भंडे, डांगे, महिला पोलीस अमलदार सरवदे यांनी केली आहे.