खा. सुधाकर श्रृंगारे यांचा प्रचाराचा झंझावात
विविध गावांत नागरिकांशी संवाद
लातूर/प्रतिनिधी ः लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांच्या प्रचाराचा झंझावाती दौरा सुरू आहे. रविवारी त्यांनी चाकूर तालुक्यातील जानवळ, दापक्याळ, नांदगाव, आटोळा, उजळंब, अंबिका रोहिणा, कबनसांगवी आदी गावांना भेटी दिल्या. तेथील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.
आ. बाबासाहेब पाटील, माजी आ. बब्रुवान खंदाडे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, सरचिटणीस भारत चामे, माजी सभापती रोहिदास वाघमारे, तालुकाध्यक्ष वसंतराव डिघोळे आदींची त्यांच्यासमवेत उपस्थिती होती.
खा. शृंगारे यांनी जानवळ येथे मारुती मंदिरात सुरू असणार्या अखंड हरिनाम सप्ताहास भेट दिली. विठ्ठल मंदिरात जावून त्यांनी दर्शन घेतले. दापक्याळ येथे खा. श्रृंगारे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. नांदगाव येथे आम्रपाली बौध्द विहारास खा. श्रृंगारे यांनी भेट दिली. आटोळा येथील संकट मोचक हनुमान मंदिरा त त्यांनी दर्शन घेतले. उजळंब येथे भेट देवून नागरिकांशी चर्चा केली. अंबिका रोहिणा गावात सम्राट अशोक बुध्द विहारात ते नतमस्तक झाले. कबन सांगवी येथील महादेव व मारुती मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. या दौर्यात खा. श्रृंगारे व आ. बाबासाहेब पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला.
नागरिकांशी बोलताना खा. श्रृंगारे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी कार्यपध्दतीने देशाचा कायापालट झाला आहे. बाबासाहेब पाटील यांनी देशाच्या संरक्षणासाठी नरेंद्र मोदी यांच्या सारख्या कणखर नेतृत्वाची गरज व्यक्त केली.
ठिकठिकाणच्या बैठकांमध्ये महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष मनिषा नवले, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विनायक साबदे, युवा मोर्चाचे मंगेश कोलबुधे, शिवसेनेचे संघटक गुणवंत पाटील, माजी सरपंच रणजित पाटील, रमाकांत चंद्रे, ज्ञानोबा भदाडे, गोविंद पवार, दगडू राठोड, धर्मराज साबदे, धोंडीराम मात्रे, भावगत कुसुंगे, पद्माकर मुरकुटे, दत्ता पवार, राहूल सुरवसे, सरपंच पुजा पाटील, उपसरपंच संतोष कासले, सचिन कांबळे, सर्जेराव पाटील, सय्यद असद, हमीद शेख, शंकर कांबळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी काळे, कार्याध्यक्ष भानुदास पोटे, सरपंच योगेश सोळंके, उपसरपंच ज्ञानेश्वर कासले, माजी सरपंच मारुती कांबळे, बाजीराव पाटील, हिरामन शिंदे, विष्णूदास कोलफुके, भीमाशंकर पाटील, धनाजी चनागिरे, शिवाजी शेटे, सिध्देश्वर लव्हारे, मधुकर माळी, प्रकाश बावगे, रमाकांत बावगे, सिध्देश्वर शेरे, दत्तात्रय गंगापुरे, सूर्यकांत पांचाळ, प्रशांत कलवले, नागनाथ गंगापुरे, लक्ष्मण टिपराळे, गणपत जाधव, उध्दव थोरात, सुनिल लांंडगे, अशोक शेळके, पांडुरंग शिंदाळकर, अंकुश जनवाडे, रणजित मिरकले, राजकुमार राजारुपे, संजय पाटील, शिवाजी नागराळे, माऊली चांगवे, पापा सुरवसे, संगम सांगवे, रमाकांत बाचीफळे आदींसह महायुतीचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.