रेणापूर
आजचा हा दिवस आपल्या समस्त खरोळा सर्कलमधील रामवाडी, तळणी, खरोळा, मोहगाव, कुंभारवाडी यांच्यासह खरोळा सर्कल मधील व समस्त रेणापूर तालुक्यातील बहुतांश गावांमधील शेतकऱ्यांवर आघात करणारा दिवस ठरला, कारण आज झालेल्या प्रचंड गारपिटीने शेतकऱ्यांच्या हाताला आलेले पीक गिळून टाकले. 😑
त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला दिसून येत आहे.
मायबाप सरकारने आज जर नुकसान भरपाई दिली नाही तर शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं? हा प्रश्न विचारला जात असतानाच…
आज जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गिरीशजी महाजन साहेब लातूर दौऱ्यावर असतानाच हा अनर्थ घडल्याने आदरणीय श्री. रमेशअप्पा कराड साहेबांनी सन्माननीय महाजन साहेबांना ह्या गोष्टीबद्दल माहिती देत रेणापूर नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्याबाबत विनंती केली,त्यावेळी लागलीच सन्माननीय महाजन साहेबांनी रामवाडी व तळणी ह्या गावातील झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी करण्याचे ठरविले व लागलीच सर्व कामकाज थांबवून घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आले.
*आज वादळी वाऱ्यासह गाराचा जोरदार अवकाळी पाऊस होऊन रामवाडी व तळणी येथील हरभरा, गहू, ज्वारी या रब्बी पिकाचे तसेच फळभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली, व तसेच खरोळा, मोहगाव, कुंभारवाडी येथील शेतकऱ्यांच्यासह रेणापूर तालुक्यातील जिथे गारपिटीने नुकसान झालेले आहे तिथले तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले व त्यासोबतच *समस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात-लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल असे शेतकऱ्यांना आश्वासनही दिले.*
आपला बळीराजा न खचता उभारला पाहिजे, ह्या बांधिलकीतुन आदरणीय कराड साहेबांनी आजच्या ह्या दौऱ्यासाठी मुख्यतः पुढाकार घेतला, आणि आज ह्या पुढाकारामुळेच गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मला विश्वास आहे की, माझ्या समस्त शेतकरी बांधवांसाठी मायबाप सरकार आर्थिक मदत घेऊन नक्कीच उभं राहिलं.
मी, आदरणीय पालकमंत्री साहेबांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल व विकासमूर्ती आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो.
धन्यवाद!
- श्री. महेंद्र गोडभरले