निलंगा,-( प्रशांत साळुंके )-
मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ व लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे संयुक्त वार्षिक अधिवेशन मंगळवार, दि.29 मार्च 2022 रोजी औसा तालुक्यातील किल्लारी येथील व्यापारी युवक वाचनालय याठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनाचे उद्गघाटन सकाळी अकरा वाजता वैद्यकीय शिक्षण व सांस्कृृतिक कार्यमंञी तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंञी अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डाॅ.गजानन कोटेवार हे राहणार आहेत.अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून भूकंप पुनर्वसन व सार्वजनिक बांधकाम राज्यमंञी संजय बनसोडे,आ.अभिमन्यू पवार,आ.सतिश चव्हाण,आ.विक्रम काळे उपस्थित यांची राहणार आहे.याच अधिवेशनात कै.ड.ञ्यंबकदास झंवर (काका) आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आणि वाचनालयाच्या नूतन इमारतीचा उद्गघाटन सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
मराठवाडा विभागातील तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालयाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,कर्मचारी यांनी या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकळे,प्रमुख कार्यवाह संतोष ससे,कार्याध्यक्ष खंडेराव सरनाईक,लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हावगीराव बेरकीळे,कार्याध्यक्ष डाॅ.ब्रिजमोहन झंवर,कोषाध्यक्ष प्रभाकर कापसे,सहकार्यवाह गुप्तलिंग स्वामी,यशोदीप व इंदिरा सार्व.वाचनालयाचे अध्यक्ष एस.आर.काळे,ग्रंथपाल प्रशांत साळुंके,ग्रंथपाल शिवराज स्वामी,व्यापारी युवक वाचनालयाचे अध्यक्ष किरण बाबळसुरे यांनी केले आहे.