“किडनी” दिनानिमित्त सुप्रसिद्ध किडनी तज्ञ डॉ. प्रमोद घुगे यांचा सल्ला]
••••••••••••••••••••••••
लातूर/प्रतिनिधी
माणसाचे शरीर जरीकरीता असंख्य घटक-अवयवांनी बनलेले असले तरी, वैज्ञानिक दृष्टिकोनातून शरीर व्यवस्थेचा एकंदरीत विचार केला असता आपल्या शरीरात हृदयानंतर सर्वात महत्त्वाचा घटक जर कोणता आहे तर तो “किडनी”…….! तेंव्हा किडनीचा आजार जीवघेणा असला तरी तो वेळेत योग्य उपचार घेतल्यास पूर्णपणे बरा होतो असा दावा सुप्रसिद्ध किडनी तज्ञ डॉ. प्रमोद घुगे यांनी “किडनी-डे” च्या निमित्ताने बोलताना केला आणि या आजाराविषयी असलेल्या भितीचा न्युनगंड दूर व्हावा म्हणून रीतसर सल्ला-मार्गदर्शनही केले.
अलीकडच्या दशकात ज्या पद्धतीने हृदयविकार-कॅन्सर-मधुमेहाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.अगदी त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूने किडनी च्या आजाराचे रुग्णही झपाट्याने वाढलेले दिसताहेत. याचे प्रमुख कारण आहे आपली दिनचर्या-जीवनशैली आणि मानसिकता…….! एकीकडे बाजारात अलीकडच्या काळात उपलब्ध होणारा धान्यसाठा व ईतर खाद्यपदार्थांसोबत दैनंदिन वापरात असणारा भाजीपाला, कार्बाईडयुक्त फळे आणि अत्यंत घातक अशी विषारी साखर यांच्यासोबत ईतर रोजच्या वापरातील शरीरावर परिणाम करणारी अन्नपदार्थ यामुळे बिघडलेली अन्नसाखळी जेवढी घातक तेवढेच व्यसनही या आजारासाठी घातक ठरत आहे असेही या निमित्ताने डॉ. घुगे म्हणाले.
व्यक्तीगत तणावासह व्यसनापासून दोन हात दूर राहत व्यायाम-आहार आणि पिण्याच्या पाण्याचे संतुलन संतुलित असणे नितांत गरजेचे असून कुठलाही आजार अंगावर न काढता, स्वतःच्या मनाने गोळ्या औषधी घेऊन त्यास तात्पुरत्या स्वरूपात दाबणे आणि नको तेंव्हा नको ते मेडीसीन अनावश्यकरित्या अनेक दिवस घेणे हेही अत्यंत घातक असून याचा वाईट परिणाम ईतरत्र कुठेही न होता तो थेट किडनी वर होतो आणि मग इथूनच खरी सुरुवात होते किडनी च्या ऱ्हासाला…….,, आणि मग वेळेत त्या संबंधित तज्ञ डॉक्टरांचा सल्ला नाही घेतला तर मात्र आयुष्याची वाताहत सुरू होते ती थेट मृत्यूच्या दारी नेऊन ठेवते. शिवाय योग्य वेळी योग्य सल्ला-उपचार न मिळालेले अनेक रुग्ण जीव गमावतानाची हजारो उदाहरणे पाहायला-बघायला मिळतात. आपल्या सात-आठ वर्षाच्या किडनी उपचार सेवेच्या माध्यमातून आजतागायत 2000 पेक्षा जास्त रुग्णांवरती योग्य तो उपचार करून त्यांना बरे केलेले आणि शेकडो रुग्णांना अक्षरशः जीवनदान दिलेले मराठवाड्यातील सुप्रसिद्ध तर लातूरचे वैद्यकीय क्षेत्रातील वैभव म्हणून अलीकडच्या काळात नावलौकिक मिळवलेल्या डॉ. प्रमोद घुगे यांनी ९ मार्च रोजी असणाऱ्या किडनी दिनानिमीत्तच्या पूर्वसंध्येला बोलताना वरीलप्रमाणे सल्ला व मार्गदर्शन करताना अगदी ठामपणे सांगितले की, किडनी चा आजार जीवघेणा असला तरी तो वेळेत उपचार घेतल्यास नक्कीच पूर्णपणे बरा होतो. तेंव्हा यासाठी गरज आहे ती न घाबरता योग्य त्या मानसिकतेने वेळेत उपचार घेऊन डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक पथ्थ्य-बाबींचे काटेकोर पालन करणे……!!