16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeठळक बातम्याकाल्याच्या कीर्तनाने भाविक-भक्त मंञमुग्ध ; जंगी कुस्त्याने सांगता

काल्याच्या कीर्तनाने भाविक-भक्त मंञमुग्ध ; जंगी कुस्त्याने सांगता

निलंगा,-( प्रतिनिधी)-निलंगा तालुक्यातील निटूर येथील जागृृत देवस्थान ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज मंदिरात दि.26 ते 3 मे पर्यंत अखंड हरिनाम व शिवकथा सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यंदा,सुश्राव्य कीर्तनकारांच्या श्रवणाने निटूर व पंचक्रोशीतील भाविक-भक्त मंञमुग्ध झाले.
दि.3 मे रोजी सकाळी ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी प्रदक्षिणा मिरवणूक भाविक-भक्तांच्या अलोट गर्दीने निघाली.गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून श्रींच्या पालखीचे स्वागत व दर्शन घेऊन मार्गक्रमण मंदिराच्या दिशेने झाली.पालखीसोबत पंचक्रोशीतील भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


तसेच,ह.भ.प.राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे मलकापूरकर (दत्त संस्थान, मलकापूर ) यांचे सुश्राव्य कीर्तनाच्या प्रसंगी बोलताना म्हणाले, चांगल्यालाही लोक नावे ठेवतात आणि वाईटलाही नावे ठेवतात त्यामुळे आपण आपल्या कामात असणे आवश्यक असल्याचे व्यक्त केले.कीर्तनसेवेमध्ये विशेष करून टाळकरी,मृृृदंगवादक,पेटीवादक आणि भाविक-भक्तांचा जनसमुदाय पाहून त्यांचेही विशेष करून कौतुक केले.पंचक्रोशीतिल अनेक भक्तगणांची याप्रसंगी उपस्थिती होती.कीर्तनसेवा झाल्यानंतर काल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला.तसेच,महाप्रसादाचा भाविक-भक्तांनी आस्वाद घेतला.
संध्याकाळी पाचच्या दरम्यान जंगी कुस्त्याचा फड रंगला अनेक कुस्तीपटू लातूर जिल्ह्याबाहेरून येऊन कुस्तीची रंगत वाढवली होती.त्यानंतर मंदिरात फटाक्यांच्या आतिषबाजीने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली.

———————————————————————
जागृृृत देवस्थान ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज मंदिरातील गेल्या तीन वर्षापासून सुशोभिकरणाचे अनेक कामे मंदिरात सद्यस्थितीला चालू आहेत.त्यामुळे यंदा सप्ताह्याची रंगत वाढली असल्याची प्रतिक्रिया अनेक भक्तांनी दिल्या आहेत.मंदिराच्या प्रवेशव्दाराच्या बाहेरील मनोर्‍याचे चौकोन स्वरूपातील सुशोभिकरणाचे काम आकर्षण वाढवणारे असल्याचेही भक्तांनी सांगितले आहे.अनेक मंदिरातील कामामुळे विश्वस्त समितीच्या सदस्यांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
———————————————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]