समाजकारणासाठी राजकारण करणाऱ्या
काँग्रेस पक्षाला जनता कधीही विसरत नाही
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
●आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने ●
●निवडणूक पूर्वतयारीसाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न●
- ●निवडणूक जिंकायचीच या जिद्दीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे●
- ●महाविकास आघाडी सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती घराघरापर्यंत पोहोचवावी●
- ●कार्यकर्त्याने स्वतःला उमेदवारी मिळणार आहे असे समजून कामाला लागावे●
- ●विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात केला जाहीर प्रवेश ●
लातूर प्रतिनिधी ३ ऑगस्ट २०२२ :
कोरोना प्रादुर्भाव काळात फक्त काँग्रेस पक्षच रस्त्यावर उतरून जनतेची मदत करत होता, नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे ते कार्य पक्षाच्या परंपरेला शोभणारे आणि कौतुकास्पद असेच होते असे नमूद करून समाजकारणासाठी राजकारण करणाऱ्या काँग्रेस पक्षाला जनता कधीही विसरत नाही हे यावेळी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आवर्जून सांगितले.
लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पुर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी काँग्रेस भवन येथे आयोजित प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीस आ. धीरज देशमुख व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होते यावेळी ते बोलत होते.
यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, माजी आमदार त्र्यंबक भिसे, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे, सचिव अभय साळुंके, श्रीपतराव काकडे, सर्जेराव मोरे, गणपत बाजुळगे, अनंतराव देशमुख, प्रमोद जाधव, रविंद्र काळे, नारायण लोखंडे, सुभाष घोडके, सुर्यशीला मोरे आदीसह काँग्रेस पक्षाचे आजी-माजी विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रत्येक निवडणूक जिंकायचीच या जिद्दीने
काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे
पूढे बोलतांना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की, येणारी प्रत्येक निवडणूक जिंकायचीच या जिद्दीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, प्रत्येक बूथ, वॉर्ड, गाव, मतदार संघ, काँग्रेस पक्षासाठी मताधिक्य देईल या पद्धतीने पक्ष बांधणी करावी, आपल्यावर असलेल्या जबाबदारीच्या मर्यादेत काटेकोर नियोजन करून कामाला लागावे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपण कार्यरत आहोत. हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे, हे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुकीत लातूर मधील काँग्रेसची ताकद देशाला व राज्याला दाखवून द्या जिल्हा परिषद व सर्व पंचायत समितीवर काँग्रेस तिरंगा फडकवा असे आवाहन करून त्यासाठी आवश्यक असणारे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी दिले.
महाविकास आघाडी सरकारने राबवलेल्या
योजनांची माहिती घराघरापर्यंत पोहोचवावी
मागच्या अडीच वर्षात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने अनेक चांगल्या योजना राबविल्या आहेत. अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. या महाविकास आघाडी माध्यमातून राबवलेल्या योजनांची माहिती घराघरापर्यंत पोहोचवावी. सामाजिक सौहदार्य तसेच कायदा आणि सुव्यवस्था कायम राखून जिल्ह्याचा समतोल विकास काँग्रेस पक्षाच करू शकतो हे जनतेला पटवून द्यावे असे आवाहनही माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी केले.
कार्यकर्त्याने स्वतःला उमेदवारी मिळणार आहे
असे समजून कामाला लागावे
प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने स्वतःला उमेदवारी मिळणार आहे असे समजून कामाला लागावे, प्रत्यक्ष निवडणुकीत ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे सांगून ज्यांना संधी मिळाली नाही त्यांची विशेष दखल घेऊन इतर ठिकाणी त्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल अशी ग्वाही दिली.
सरकारच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी
भरघोस निधी मंजूर करून आणला
आमदार धिरज देशमुख
लातूर येथील काँग्रेस भवन येथे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. अमित विलासराव देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीस उपस्थित राहून आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्याशी संवाद साधला.
लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे नेतृत्व, त्यांचा दूरदृष्टीपणा, त्यांचा सखोल अभ्यास यामुळे लातूर घडले असे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले.
लातूरमध्ये शिक्षणाचा पॅटर्न निर्माण करण्याबरोबरच कृषी, सहकार, आरोग्य, जलसंपदा अशा क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडला. जिल्हा बँक, बाजार समिती नावारूपाला आणली. इथल्या सर्वसामान्य, शेतकरी बांधवांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडली. हे सर्व काँग्रेसमुळे आणि आपल्याला लाभलेल्या नेतृत्वामुळे शक्य झाले. विकासाचा हा आलेख आपल्याला कायम ठेवायचा आहे असे म्हणाले.
माजी मंत्री, आमदार अमित देशमुख साहेब यांनी अडीच वर्षाच्या काळात मविआ सरकारच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस निधी मंजूर करून आणला. लातूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात निधीचे समान वाटप केले. कोरोना काळात जिल्ह्यात आरोग्याच्या सोयी सुविधा निर्माण केल्या. वैद्यकीय सामग्री व सुविधांचा तुटवडा पडू दिला नाही. त्यामुळे जिल्ह्यात मृत्युदर कमी राहिला. पूर-अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने दिली. सहकार, बँक आदीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा विकास साधला. आपण आजवर केलेली लोकहिताची विविध विकासकामे आपल्याला लोकांपर्यंत घेवून जायची आहेत. या बळावर आगामी निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा आपण निर्धार करु, असे आवाहन यावेळी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले.
यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे यांनी आपले मनोगत व्यक्त करून भाजपचे चुकीचे धोरण, महागाई व काँग्रेसने व महाविकास आघाडीने केलेली विकासकामे कार्यकर्त्यांनी घरोघर पोहोचवावीत असे सांगितले तर लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी प्रास्ताविक करून जिल्ह्यात काँग्रेसने केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. या बैठकीचे सूत्रसंचालन सचिन सूर्यवंशी यांनी केले शेवटी आभार सरचिटणीस अमर खानापुरे यांनी मानले.
यावेळी चाकूर तालुका अध्यक्ष विलास पाटील, अहमदपूर तालुका अध्यक्ष हेमंतराव पाटील, देवणीचे अध्यक्ष अजित बेळकूणे, आबासाहेब पाटील उजेडकर, धनंजय देशमुख, मारूती पांडे, दगडूसाहेब पडीले, सचिन दाताळ, बाबासाहेब गायकवाड, प्रवीण सूर्यवंशी, ज्ञानेश्वर भिसे, पृथ्वीराज सिरसाट, चंद्रकांत मददे, प्रा.सुधीर पोददार, प्रविण पाटील, शाम भोसले, मुन्ना पाटील, गोविंद बोराडे, राजकूमार पाटील, विजय निटूरे, शरद देशमुख, रमेश सुर्यवंशी, एकनाथ पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आजी – माजी पदाधिकारी उपस्थित होते.
विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी
काँग्रेस पक्षात केला जाहीर प्रवेश
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बहुजन समाज पार्टी, (बीएसपी) लातूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत बनसोडे, नगरसेवक रहीमखान पठाण, सामाजिक कार्यकर्ते उमेर शेख आदींनी आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात यावेळी प्रवेश केला आमदार देशमुख यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
———-