तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलेला सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश
-आ.अमित विलासराव देशमुख
लातूर (प्रतिनिधी):ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. हा निकाल स्वागताहार्य असून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतलेली भूमिका आणि सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचेच हे यश आहे. अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने बांठिया आयोग नेमून इम्पेरिकल डाटा एकत्रित करून तो अहवाल न्यायालयात सादर केला होता. तो अहवाल स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने दिलासादायक निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायच्या नाहीत ही तत्कालीन सरकारची भूमिका योग्यच होती हे आता सिद्ध झाले आहे. असेही आमदार अमित देशमुख यांनी या संदर्भाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.