शास्त्री विद्यालयात गुरूपौर्णमेनिमित्त विद्यार्थ्यांचे आॕनलाईन कथाकथन
उदगीर( दि23) येथील लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक लालासाहेब गूळभिले, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप राव कुलकर्णी, प्रमुख वक्ते तथा शालेय समिती अध्यक्ष संतोष राव कुलकर्णी , उपमुख्याध्यापक अंबादास राव गायकवाड , पर्यवेक्षिका अंबुताई दीक्षित या सर्वांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यास व दत्तोपंतजी ठेंगडी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. गुरुपौर्णिमेनिमित्त समर्पण निधी जमा करण्यात आला… या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी कथाकथन घेण्यात आले ..श्रेया येरोळे अक्षरा दुरुगकर ..सुरभी नाईक …निखिल पाटील या विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्य परंपरेच्या कथेचे सादरीकरण केले…
प्रमुख वक्ते संतोष राव कुलकर्णी गुरूपौर्णिमेचे महत्त्व सांगताना असे म्हणाले की विद्यार्थ्यांना समाजात वावरण्याचे ज्ञान.. जीवन कसे जगावे याविषयीचे ज्ञान आपले गुरू देतात. प्रथम गुरु आपली आई आणि त्यानंतर जे जे आपल्याला शिकवतात ते सर्वच आपले गुरु असतात. विद्यार्थ्यांकडून संकल्प करून घेऊन त्यांना ध्येयाप्रती मार्ग क्रमण करण्याचे मार्गदर्शन गुरु करत असतात. आजचा दिवस हा गुरु प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
यानंतर अध्यक्षीय समारोपात पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले यांनी गुरुचे आपल्या जीवनातील स्थान स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, स्वागत व परिचय मीनाक्षी कस्तुरे, प्रास्ताविक प्रिती शेंडे, आभार श्रीपत समुखे यांनी मांडले… कार्यक्रमाची सांगता शांतीमंत्राने किरण नेमट यांनी केली.