साहित्य संमेलन नियोजन संदर्भात रविवारी जिल्हा ग्रंथालय संघाची बैठक
उदगीर,-(प्रतिनिधी)-
95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमे लन नियोजन संदर्भात व मराठी राज भाषा दिनानिमित्य लातूर जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी व कर्मचारी यांची बैठक रविवारी २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय,उदगीर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकिस प्रमुख मार्गदर्शक सार्वजनिक बांधकाम व पर्यावरण खात्याचे राज्यमंत्री ना. संजय बनसोडे हे राहणार असून अध्यक्षस्थानी संमेलनाचे कार्याध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर राहणार आहेत.यावेळी प्रमुख उपस्थिती मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे ,जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हावगीराव बेरकिळे, कार्याध्यक्ष डॉ. ब्रिज मोहन झंवर ,संस्था उपाध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषद उदगीर चे अध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी ,सहसचिव डॉ.श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी , उपप्राचार्य डाॅ.आर के.मस्के यांची उपस्थिती लाभणार आहे. बैठकीत मराठी राज्यभाषा दिनानिमित्त मराठी भाषेच्या समृद्धीसाठी चर्चा ,राज्याच्या ग्रंथालय व कर्मचाऱ्यांच्या समस्या संबंधी चर्चा करून निवेदन शासन दरबारी देणे, उदगीर येथे होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना संबंधी सविस्तर चर्चा करून सहभाग नोंदविणे, वाचन चळवळ वाढवण्या संबंधी चर्चा करून त्याची अंमलबजावणी करणे हे विषय राहणार आहेत या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यकारणी सदस्य राम मोतीपवळे यांनी केले आहे.