पालावरची दिवाळी, एक दिवा वंचितांसाठी.
औसा – आमदार अभिमन्यू पवार व त्यांच्या पत्नी सौ.शोभा पवार यांनी किल्लारी येथील पालावर जाऊन तेथील वंचित आणि गोरगरिबांसोबत आपली दिवाळी साजरी केली.यावेळी आ.अभिमन्यू पवार यांच्या वतीने भाऊबीज निमित्ताने साडी, मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले तर याचवेळी त्यांना फटाक्यांचा आनंद घेता आला. त्यामुळे पलावरील मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते. आर्थिक दारिद्र्यामुळे पालावर राहून आपले जीवन व्यतीत करणाऱ्या समाजातील दुर्बल घटकांच्या घरातही दिवाळीचा आनंद फुलला पाहिजे. त्यांनाही मीष्ठान्नाचा स्वाद घेत फटाके आणि फुलझडांच्या दीपोत्सवामध्ये सहभागी होत आले पाहिजे. प्रत्येकाच्या घरातील दिवाळी अत्यंत उत्साहात साजरी झाली पाहिजे यासाठी दुर्बल घटकाच्या पालावर जाऊन पवार दाम्पत्याने आपली दिवाळी साजरी केली .
यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांच्या सूचनेनुसार पक्षातील पदाधिकाऱ्यांने विविध ठिकाणी वस्ती करून राहणाऱ्या उपेक्षित घटकांसोबत दिवाळी साजरी केली.यामध्ये विधानसभा निवडणूक प्रमुख संतोषअप्पा मुक्ता औसा शहरातील वस्ती ,मंडळ अध्यक्ष औसा शहर सुनील उटगे व औसा शहर मंडळ युवा मोर्चाचे अध्यक्ष गोपाळ धानूरे यांनी पिरामगजवाडी ( वस्ती ) ,कासारसिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे ,धनराज होळकुंदे यांनी रामलिंग मुदगड वाडी (वस्ती) ,जिल्हा उपाध्यक्ष किरण उटगे व भटक्या विमुक्त आघाडी अध्यक्ष यांनी किल्लारी येथील ( वस्ती) ,जिल्हा उपाध्यक्ष नितीन आचार्य व वामन मुळे यांनी कासार बालकुंदा ( वस्ती) ,बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे ,संगायो समितीचे अध्यक्ष काकासाहेब मोरे ,किसान मोर्चाचे अध्यक्ष बालाजी निकम पारधे वाडी ( वस्ती ),बाजार समितीचे उपसभापती प्रा भीमाशंकर राचट्टे ,जिल्हा चिटणीस हनुमंतवाडी ( वस्ती ), लहू कांबळे,दिपक चाबुकस्वार आलमला वस्ती ( वस्ती ),ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा सुधीर पोतदार ,जिल्हा चिटणीस अॅड श्रीधर जाधव नागरसोगा ( वस्ती ),प्रवीण कोपरकर ,रमेश वळके पाटील उजनी (वस्ती ),रोहयो समितीचे अध्यक्ष सदाशिव जोगदंड ,ज्ञानेश्वर इंजे याकतपूर रोड आदी ठिकाणी दिवाळी साजरी करण्यात आली.
याप्रसंगी आमदार अभिमन्यू पवार पालावर नागरिकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेत येणाऱ्या भाऊबीज पर्यंत संबंधित प्रश्न सोडविण्यात येतील अशी ग्वाही दिली.यावेळी अशोक तांबे, किरण उटगे, साई , सिद्धू बालकुंदे, विजय माने, बालाजी जाधव, गोविंद भोसले, युवा मोर्चा मंडळाध्यक्ष नितीन कवठाळे, धनराज परसने, बंकट पाटील, संदीप शिवनेचारी, अशोक गावकरे, शाम बिराजदार, बीसार ठाकूर, गुलाब शिंदे, ईश्वर घोटाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक केदारे, आबा इंगळे, गणेश बिराजदार, धनराज बाबळसुरे, शरद माने, विलास सगर, काशिनाथ मुळे, बालाजी विभूते, लक्ष्मण गायकवाड उपस्थित होते.
………………….
पालावर च्या उच्च शिक्षीत तरुणास जागेवरच दिली नौकरी …..
यावेळी बालाजी विभुते या उच्च शिक्षीत तरुणांनी आपली व्यथा मांडली त्याने बीए फर्ग्युसन कॉलेज तर एम.ए. चे शिक्षण एसपी काॅलेज मधून पुर्ण केले आहे मात्र तरीही मला स्क्रॅप गोळा करण्याचे काम करावे लागते.मला जातीचे प्रमाणपत्र काढताना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी ऐवढया उच्च शिक्षीत तरुणाला अशा प्रकारचे काम करावे लागते हे मला संयुक्तिक वाटत नसल्याने सांगून सदरील तरुणाला त्यांनी स्वीय सहाय्यक म्हणून काम देत भटक्या विमुक्त समाजाचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी या तरुणावर दिली.या मुळे जागेवरच या तरुणास नौकरी मिळाली.