22.7 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeआंतरराष्ट्रीय*आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद*

*आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद*

स्वकष्टाने उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात प्रचंड प्रतिसाद
नवी दिल्ली, 28 : स्वकष्टाने उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात चांगला प्रतिसाद मिळत असल्याची महाराष्ट्र दालनातील बचत गट, लघू उद्योजक, विविध वस्तु उत्पादन समुह केंद्रांच्यावतीने लावलेल्या स्टॉल धारकांनी उत्सफूर्त प्रतिक्रिया दिली.
येथील प्रगती मैदानात 41 वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयाची सुरूवात 14 नोव्हेंबरपासून झाली आहे. महाराष्ट्र या यावर्षी ‘भागीदार राज्य’ म्हणून आहे. महाराष्ट्र दालन हे सर्वसामवेश असे दालन दिसत आहे.


असे आहे महाराष्ट्र दालन
महाराष्ट्र दालनाच्या प्रवेशव्दारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला पुतळा आहे. येथे स्वागतासाठी तुतारी वादक आहेत. विविध विभागाकडून राज्याचा होत असलेला सर्वांगीण विकास दर्शविण्यात आला आहे. दालनाच्या मधल्या भागात इलेक्ट्रीकल ऑटो, बॉईक, भारतीय नौदलाला लागणारे सुटे भाग, फिरती पृथ्वी, पैठणीत असलेली महिलेची प्रतिमा असे दालनाचे रूप आहे. दालनाच्या बाहेरच्या बाजूस इलेक्ट्रीकल चारचाकी वाहन आहे. येथे राज्याच्या उद्योग वाढीचा आलेख दिसत आहे यासोबतच बचत गट, वस्तु उत्पादन समुह अंतर्गत विविध उत्पादित वस्तुंची दालने मांडण्यात आलेली आहेत. आधुनिक आणि पारंपरिक अशी सरमिसळता महाराष्ट्र दालनात दिसते.
सांगलीची हळद, मनुके, जळगाव जिल्ह्यातील विशेषता असणा-या केळींची विविध पदार्थ, औरंगाबाद जिल्ह्याची साखळी हस्तकला, बंजारा हस्तकला, कोल्हापूरच्या चपला, दागीने, मुंबईतून आलेल्या समूहाची लेदर बॅग आणि कापडयांची बॅगचे स्टॉल्स आहेत.
सांगलीच्या हळदीला, आणि जळगाव च्या केळींना भौगोलिक मानाकंन (जियो टॅग)मिळाले आहे. या ठ‍िकाणी असलेल्या या दालनांना ग्राहकांनी विशेष पसंती दिली आहे. उरमेरीक वस्तु उत्पादन समुह (कल्सटर) सांगलीवरून आलेल्या या समुहातील दालनात हळद, मनुके, कांदा लसून चटणी, तीळाची, जवस, नारळाची चिक्की आहे. या सर्व वस्तुंना ग्राहकांची प्रचंड मागणी असल्याचे योगेश कोठवाल यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील यावल येथील संकल्प एन्टरप्राईजेस चे अशोक गडे यांनी केळींवर प्रक्रिया करून खाद्य पदार्थ बनविलेले आहेत. यात केळीचे बिस्कीट, चॉकलेट, लाडू आहेत. या पदार्थांचे त्यांचे स्वामित्व (पेटेंट) ही आहेत. येथे व्यापार मेळयात प्रथम आले असल्याचे त्यांनी सांगितले. येथे त्यांना अनेक व्यवसायिकांनी संपर्क साधून दरमहा मोठया प्रमाणात माल उपलब्ध करून देण्याची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.


अभिषेक बंजारा वस्तु उत्पादन समूहाचे स्टॉल याठिकाणी आहे. या स्टॉलवर बंजारा समुहात वापरत असलेली विविध जुन्या पैश्यांची दागीने, पॅच वर्क, बॅग्स आहेत. स्टॉल अतिशय सुंदर सजविलेले आहे. विशेष म्हणजे या उत्पादन समुहाकडून प्लाजो-स्कर्ट धोती सारखे बनविले आहे. ते कसे नेसतात हे ही श्री बालाजी पवार यांनी दाखविले. हा पॉल्जो-स्कर्ट मुलींना विशेष आवडत असल्याचे श्री पवार यांनी सांगितले.
शिव समर्थ महिला उद्योग क्रेंद्र, सांगलीच्या सुनंदा म्हेत्रे यांनी सांगितले, प्रथमच व्यापार मेळयात स्टॉल लावायची संधी मिळाली, याचा आनंद आहे देशाच्या राजधानीत मंच मिळवून दिल्याबद्दल शासनाला धन्यवाद दिले. लोक येतात विचारपूस करतात. ज्यांना खरी जाण आहे ते विकतही घेतात, अशी प्रतिक्रीया श्रीमती म्हेत्रे यांनी दिली. यांच्या दालनात अव्वल दर्ज्याचा काजू, मुनके, हळद, कोकम हे पदार्थ आहेत.
‘बटूआ लेदर’ या नावाने हरदिप सिंग यांचा मागील 23 वर्षांपासून लघु व्यवसाय आहे. ते या व्यापार मेळयात प्रथमच आलेत त्यांच्या या स्टॉल्सला महिला-पुरूषांची गर्दी दिसते. येथे चांगला प्रतिसाद असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली.
ऐनीटाईम स्नॅक्स या स्टॉलमध्ये आरोग्याला लाभदायक असा ज्वार, बाजरा आणि नाचणीचा चिवडा आहे. या स्टॉल्सला आरोग्य जागरूक ग्राहकांची विशेष पसंती आहे.


गुणवत्तापुर्ण आणि दर्जेदार बॅग बनविणा-या दिप्ती क्रीयेशन्सच्या दिप्ती मागील 5 वर्षांपासून हॅन्ड बॅग बनवित आहे. ज्यांना दर्जेदार वस्तूंची आवड आहे त्या स्टॉल्सला भेट देऊन खरेदी करतात, असे श्रीमती दिप्ती यांनी सांगीतले.
सातारा, वाई वरून आलेले किरण ताबवे यांच्या चपलांचे स्टॉल आहे. यांच्या दालनालाही मुली, महिलांची विशेष पसंती आहेत. पायांना आरामदायक अशा चपलांची निर्मिती श्री ताबवे करतात. यासह ते प्रत्येकांच्या मागणीनुसार हव्या तशा चपला बनवुन देत असल्याचेही त्यांनी सांगीतले.
औरंगाबाद येथील रोहीदास महाराज बचत गट यांच्या स्टॉलवर साखळी टाक्याचे लोभस कुर्ती आहेत. या कुर्तींना तरूण मुलींची विशेष आवडत असल्याचे श्याम चंद्र यांनी माहिती दिली. आठ वर्षांपासून हा लघू व्यवसाय करीत असल्याचे श्री चंद्र यांनी सांगितले.


हातमागावरील पैठणी बनविण्याचे प्रात्यक्षिक
महाराष्ट्र लघु विकास महामंडळाच्यावतीने हातमागावरील पैठणी बनविण्याचे प्रात्यक्षिक याठ‍िकाणी मांडण्यात आले आहे. नंदिनी झुंझे आणि मीनाक्षी वावळ या प्रशिक्षित पैठणी बनविणा-या महिला हे प्रात्यक्षिक करून दाखवित आहेत. या दालनास लोक आर्वजून भेट देऊन येथे थांबून हे प्रात्यक्षिक बघत असल्याचे या दोघींनी सांगितले. पैठणी कशी विणली जाते आणि पैठणी या महावस्त्राबद्दल कुतूहलाने विचारतात.
हे प्रदर्शन दि.27 नोव्हेंबरपर्यंत आहे. शनिवारी, 26 नोव्हेंबरला सायंकाळी 5.30 वाजता कोल्हापूर येथील श्रीजा समुहातर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम येथील खुल्या सभागृहात सादर केला जाणार आहे.
000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]