18.3 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeठळक बातम्याअहमदपूर काँग्रेसचं ठरल!कोणाशीही आघाडी नाही...

अहमदपूर काँग्रेसचं ठरल!कोणाशीही आघाडी नाही…


 काँग्रेस नगर परिषद निवडणूक स्वबळावरच लढणार!
पालकमंत्री अमित देशमुख यांचे अहमदपूर नगर परिषद निवडणूकीकडे विशेष लक्ष

शहरातील काँग्रेसचे सर्व नेते प्रथमच एकत्र
कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून केला जल्लोष

     अहमदपूर/प्रतिनिधी : अहमदपूर नगरपालिकेची आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा, कोणाशीही आघाडी न करण्याचा निर्णय सोमवारी ( दि. १६ ) झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आला. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनात पालिका स्वबळावर ताब्यात घेण्याचा निर्धारही या बैठकीत करण्यात आला. जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे व अहमदपूर निवडणूक प्रभारी तथा लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे व काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.  

 आगामी अहमदपूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विमलाबाई देशमुख विद्यालय येथे सोमवारी पक्ष पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या निमित्ताने शहरातील काँग्रेसचे सर्व नेते प्रथमच एकत्रित आल्याचे सुखद चित्र पहावयास मिळाले. नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. लवकरच हा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

त्यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील जेष्ठ नेते व पदाधिकारी यांच्या भेटी घेवून कौल जाणून घेतला होता, त्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांच्या समवेत झालेल्या चर्चेतून आजचा हा निर्णय जाहीर करण्यात आला.यावेळी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष विजय निटुरे, सेवादल जिल्हाध्यक्ष रमेश सुर्यवंशी, भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष सुरेश चव्हाण, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सिरजोद्दिन जहागिरदार, अहमदपूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी बी लोहारे, भारत रेड्डी, तालुकाध्यक्ष ॲड हेमंत पाटील, शहराध्यक्ष विकास महाजन, जिल्हा नियोजन समिती सदस्य चंद्रकांत मद्दे, माजी तालुका अध्यक्ष डॉ गणेश कदम, माजी उपनगराध्यक्ष कलीमोद्दिन अहमद, नगरसेवक रवी महाजन, जावेद बागवान, रघुनाथ मदने, सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस राम गोरड, युवक विधानसभा अध्यक्ष नीलेश देशमुख, युवक तालुकाध्यक्ष अनिल शेळके, देवानंद मुळे, सय्यद मुजम्मिल, मारोती माने, मोहित वारे, दयानंद वाघमारे, खंडेराव शेवाळे, सतीश सुर्यवंशी, सलमान पठाण यांच्यासह शहरातील पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.    जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी अहमदपूर पालिकेच्या निवडणुकीकडे पालकमंत्री अमित देशमुख यांचे विशेष लक्ष असून पक्षाच्या वतीने सर्व ती मदत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगितले. तर प्रभारी विक्रांत गोजमगुंडे यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरत अहमदपूर काँग्रेसमध्ये नवचैतन्य प्राप्त झाले असल्याचे सांगत राज्यात काँग्रेस सत्तेत सहभागी आहे. लातूरच्या महानगरपालिकेसह विविध सहकारी संस्था पक्षाकडे आहेत. अशा स्थितीत अहमदपूरची नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात असावी यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. स्वबळावर सत्ता हस्तगत करण्याचा निर्धार करून एकत्रितपणे प्रयत्न केले तर निवडणूक जिंकणे सोपे जाईल. अहमदपुर शहरात काँग्रेसला मोठा जनाधार आहे. त्याच्या पाठबळावरच कोणाशीही आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढवण्याचे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी डी बी लोहारे गुरुजी, ॲड हेमंत पाटील, सांबअप्पा महाजन, भारत रेड्डी, डॉ गणेश कदम,  चंद्रकांत मद्दे, कलिमोद्दिन अहमद, सय्यद मुज्जमिल, प्रकाश ससाणे, प्रफुल्ल ढवळे, यावा नेते अक्षय देशमुख,  यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून कामाला लागण्याच्या सूचना केल्या. सर्व काँग्रेस नेते व कार्यकर्ते यांनी अहमदपूर नगर परिषद निवडणूकित कोणाशीही आघाडी न करता स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्धार उपस्थित लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या बैठकीमुळे पक्षाचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला असून ते जोमाने कामाला लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्वबळावर लढण्याचा पक्षाच्या निर्णयानंतर कार्यकर्त्यांनी शहरातील शिवाजी चौक येथे फटाके वाजवून आनंद साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]