कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचा इशारा
इचलकरंजी ; दि. २१ (प्रतिनिधी ) –इचलकरंजी येथील तथाकथित कामगार पुढारी सुभाष मालपाणी हे शहरातील अंगणवाडीमध्ये परवानगी शिवाय घुसून कामाचे दप्तर तपासून त्यामध्ये मुद्दाम चुका काढत कर्मचाऱ्यांना कारवाईची धमकी देत आहेत.त्यांनी चुकीच्या पद्धतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नाहक ञास देण्याचासुरु ठेवलेला उपदव्याप न थांबवावा.अन्यथा त्यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ या संघटनेच्या वतीने आंदोलन करु ,असा इशारा संघाचे जिल्हा कमिटी सदस्य धोंडीबा कुंभार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ ही संघटना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे.या संघटनेकडे इचलकरंजी शहरातील तथाकथित कामगार पुढारी सुभाष मालपाणी यांच्या विरोधात लेखी स्वरुपात तक्रारी आल्या आहेत.या तक्रारींमध्ये , सुभाष मालपाणी हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये याप्रमाणे कोरोना प्रोत्साहन भत्ता मिळवून देतो , कार्यकर्त्यांना सुपरवायझर करुन पगार लागू करतो अशा वल्गना करतानाच
शहरातील विविध अंगणवाडीमध्ये परवानगी शिवाय घुसून कामाचे दप्तर तपासून त्यामध्ये मुद्दाम चुका काढत आहेत.तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कारवाईची धमकी देत त्यांना नाहक ञास देण्याचा प्रयत्न करत आहेत.
वास्तविक , अंगणवाडी कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे.असे असताना सुभाष मालपाणी हे कोणताही अधिकार नसताना अंगणवाडी कामकाजात लक्ष घालून कर्मचाऱ्यांना कारवाईची धमकी देत नाहक ञास देण्याचा प्रयत्न करत असल्याचा उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे जिल्हा कमिटी सदस्य धोंडीबा कुंभार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.तसेच सुभाष मालपाणी यांनी
चुकीच्या पद्धतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नाहक ञास देण्याचा सुरु ठेवलेला उपदव्याप न थांबवल्यास त्यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आंदोलन करु ,असा इशाराही धोंडीबा कुंभार यांनी पत्रकाच्या शेवटी दिला आहे .