लातूरची उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती
शहराचे आणि जिल्ह्याचे अर्थकारण मजबूत करणारी संस्था
◆सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाज कार्य करणाऱ्या
कृषी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे
अमित विलासराव देशमुख◆
■अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मार्केट यार्डची उभारणी
विद्यमान मार्केट यार्डचाही पुनर्विकास■
●विरोधी मंडळीकडून नकारात्मक विचाराची पेरणी●
◆जिल्हा बॅक, मांजरा परिवारातील साखर कारखान्याच्या
धर्तीवर बाजार समितीचाही कारभार◆
लातूर प्रतिनिधी : शनिवार दि. २२ एप्रिल २०२३
लातूरची उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती फक्त शेतीमालाची खरेदी विक्री करणारी संस्था नसून ती या शहराचे आणि जिल्ह्याचे अर्थकारण मजबूत करणारी संस्था आहे. त्यामुळे ही संस्था अधिक सक्षम बनावी यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाज कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना कृषी विकास पॅनलच्या माध्यमातून उमेदवारी दिली आहे. या सर्व १८ उमेदवारांना प्रचंड मताधिक्क्यांने विजयी करावे, असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक – २०२३ लढवत असलेल्या कृषी विकास पॅनलच्या प्रचारार्थ शनीवार दि. २२ एप्रिल रोजी सायंकाळी बाभळगाव येथे पाखरसांगवी, महापूर, हरंगुळ बु., बाभळगाव, भातांगळी जिल्हा परिषद सर्कल मधील प्रमुख पदाधिकारी आणि बाजार समिती मतदारांचा व्यापक मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी ते बोलत होते.
या मेळाव्यास लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्रंबक नाना भिसे, राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, माजी सभापती ललितभाई शहा, उपसभापती मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, धनंजय देशमुख, माजी महापौर दीपक सुळ, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा विद्याताई पाटील यांच्यासह कृषि विकास पॅनलचे सर्व उमेदवार, निरीक्षक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी, पाखरसांगवी, महापूर, हरंगुळ बु., बाभळगाव, भातांगळी, जिप सर्कल मधील मतदार, शेतकरी, काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अद्ययावत ्आतरराष्ट्रीय दर्जाच्या
मार्केट यार्डची उभारणी
यावेळी पूढे बोलतांना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूरची बाजारपेठ आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे स्वप्न होते, ते स्वप्न साकार करण्यासाठी आजवर आपण अनेक टप्पे पार केले आहेत, लवकरच एमआयडीसी परिसरातील 150 एकरवर अद्यावत मार्केट यार्ड उभारण्याच्या कामाला सुरू होणार आहे त्याचबरोबर विद्यमान मार्केट यार्डचाही पुनर्विकास करण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
समाजकारणात वावरत असताना ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्यांच्याशी इमान राखले पाहिजे अशी पूर्वजांची शिकवण आहे, त्या शिकवणीचा आम्ही कधीही विसर पडू दिला नाही असे सांगून, कृषी विकास पॅनलची उभारणी त्याच विचारातून केली असल्याचे यावेळी माजी मंत्री, आमदार देशमुख यांनी यावेळी नमूद केले.
जिल्हा बॅक, मांजरा परिवारातील साखर कारखान्याच्या
धर्तीवर बाजार समितीचाही कारभार
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मांजरा परिवारातील सर्व साखर कारखाने व इतर अनेक संस्था अत्यंत उत्तम रीतीने चालवल्यामुळे देश आणि राज्य पातळीवर या संस्थांचा लौकिक निर्माण झाला आहे. त्याच धर्तीवर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचाही कारभार चालवला जात आहे, पुढेही त्याच पद्धतीने चालवला जाईल अशी ग्वाही पॅनल मधील उमेदवारांच्या वतीने माजी मंत्री, आमदार देशमुख यांनी यावेळी दिली.
स्वत:ची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी
विरोधी मंडळीकडून नकारात्मक विचाराची पेरणी
स्वतःची महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी विरोधी मंडळीकडून नकारात्मक विचाराची पेरणी केली जात आहे. कृषी विकास पॅनल मात्र विकासाचा, नवनिर्माणाचा विचार घेऊन निवडणूकीत उतरली आहे. त्यामुळे या पॅनलला मतदारांनी आशीर्वाद द्यावेत अशी विनंती शेवटी यावेळी माजी मंत्री, आमदार देशमुख यांनी केली.
राज्यात आणि देशात असलेला
लातूर बाजार समितीचा लौकीक जपला जाईल
धीरज देशमुख
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव देण्याचे काम लातूर कृषि उत्पन्न बाजार समिती करते या वैशीष्टयामुळेच या बाजार समितीचा लौकीक महाराष्ट्र आणि देशभरात आहे. गेल्या अनेक वर्षात हा लौकीक जपण्याचे काम येथील नेतृत्वाने केले. पूढेही हा लौकीक वाढता रहावा म्हणून कृषि विकास पॅनलच्या उमेदवारांना लातूर तालुक्यातील सुजाण मतदारांनी आशीर्वाद दयावेत असे आवाहन लातूर ग्रामिणचे आमदार धीरज देशमुख यांनी केले.
बाजार समितीचा कारभार अत्यंत
काटोकोर आणि काटकसरीने केला
लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीचा कारभार अत्यंत काटोकोर आणि काटकसरीने केल्याचे माजी सभापती ललीभाई शहा यांनी यावेळी बोलतांना सागितले. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आडत दुकानदारांनाही त्रास होऊ नये हमाल, मापाडी, मजूर या सर्व घटकांच्या श्रमाचा मोबदला मिळावा याची काळजी घेतली असे त्यांनी म्हटले. बाजार समितीचा कारभार अत्यंत काटकसरीने केल्याने आज जवळपास १०० कोटींच्या ठेवी बॅकेत जमा असल्याचे सांगून मार्केट यार्ड उभारणीत ही रक्कम उपयोगास येणार असल्याचे ललीभाई शहा यांनी सांगतिले.
यावेळी बोलतांना माजी आमदार वैजनाथराव शिंदे म्हणाले की, आदरणीय विलासराव देशमुख, आदरणीय दिलीपराव देशमुख यांनी अनेक संस्था उभा केल्या आहेत. पूढच्या पिढीकडूनही त्या उत्तमीरीतीने चालवण्यात येत आहेत. विरोधकांकडे मात्र त्यांचे कतृत्व सांगण्या सारखे काहीच नाही त्यामूळे ते केवळ बेछूट आरोप करीत आहेत त्यावर कोणीही विश्वास ठेऊ नये असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यात आदर्श नेतृत्वाचा जिल्हा म्हणून लातूर जिल्हयाची ओळख आहे ही ओळख आपण जपली पाहिजे असे सांगून कृषि विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन माजी आमदार त्रयबंक भिसे यांनी केले.
यावेळी रेणाचे माजी चेअरमन आबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या मेळाव्याची सुरूवात झाली.